इचलकरंजीकरांसाठी पिण्याचे पाणी आणले नाही, तर कोणतीही निवडणूक लढविणार नाही : खास. धैर्यशील माने
इचलकरंजी / प्रतिनिधी
येथील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर काही मंडळी राजकारण करीत आहेत. मात्र सामान्य जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठीच मला जनतेने निवडून दिले आहे. इचलकरंजीच्या नागरिकांसाठी पिण्याची पाणी योजना आणण्याचे काम माझे आहे. भविष्यकाळात इचलकरंजीला पिण्याचे पाणी मी आणले नाही , तर भविष्यकाळात कोणतीही निवडणूक लढविणार नसल्याचा निर्धार खास . धैर्यशिल माने यांनी केला . इचलकरंजी येथील थोरात चौकातील प्रचार सभेत ते बोलत होते .
पुढे खास. माने यांनी सांगितले, इचलकरंजीच्या पंचगंगा नदीचा पाणी प्रदूषण प्रश्र खुप महत्वाचा असून प्रदुषण मुक्त करण्यासाठी सीईटीपी प्रकल्पासाठी 532 कोटी रुपये मंजूर केले असून लवकरच ते काम पूर्ण होऊन पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होईल. तसेच इचलकरंजीच्या पिण्याच्या पाण्याची सुळकुड पाणी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने मी स्वत? मंजूर करून आणली आहे त्यासाठी 161 कोटी निधी मंजूर केला आहे. दोन वेळा टेंडर ही प्रसिद्ध झाले आहे .लवकरच पाणी योजनेचे काम सुरू होईल.
प्रचारसभेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव घोरपडे, सदाभाऊ खोत, खास. धनंजय महाडिक, खास . अनिल बोंडे, माजी खासदार निवेदिता माने, माजी आम . सुरेश हाळवणकर यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.