महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बर्फाच्या गुहेत रेस्टॉरंट

06:39 AM Jan 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चहुबाजूला बर्फ असलेल्या ठिकाणी निर्मित आइस केव्ह कॅफेत गरम चहा किंवा कॉफी पिणे कुणाला आवडणार नाही. उणे तापमानात गरम चहाचा आनंद घ्यायचा असेल तर स्पीति खोऱ्याला भेट द्या. काजाच्या लिंगटीमध्ये लिंगटी पुलानजीक स्थानिक युवांनी आइस केव कॅफे निर्माण करत पर्यटनाला चालना देण्याचा अनोखा पुढाकार घेतला आहे. युवांनी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत पाणी गोठवून आइस केव्ह कॅफे तयार केला आहे. या कॅफेत बसून तुम्ही गरम चहा तसेच कॉफीचा आनंद घेऊ शकता.  पाणी गोठवून गुहा तयार करणारे ललूंग गावाचे रहिवासी लोबदे बौद्ध, तंडूप छेरिंग आणि लाकपा छेरिंग यांनी बर्फाच्या गुहेच्या निर्मितीकरता 27 दिवस लागल्याचे सांगितले आहे. बर्फाची गुहा तयार करताना काही युवा आजारीही पडले, परंतु ते हिंमत हरले नाहीत. सध्या या आइस केव्ह पॅफेत मोजकेच पर्यटक येत आहेत, परंतु आगामी काळात पर्यटकांची याला पहिली पसंती मिळेल, असे त्यांचे सांगणे आहे.

Advertisement

लाहौल स्पीति एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असून येथे विविध प्रकारच्या व्यंजनांचा आनंद घेता येणार आहे. स्पीतिचे खानपान अन् राहणीमान लडाख अन् तिबेटशी मिळतेजुळते आहे. बहुतांश रेस्टॉरंटमध्ये भारतीय भोजन उपलब्ध आहे. स्पीति खोऱ्यातील स्कयू, फॅमर, शूनाली पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article