महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आइसलँडमध्ये खचली बर्फाची गुहा, एकाचा मृत्यू

06:52 AM Aug 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बर्लिन

Advertisement

दक्षिण आइसलँडच्या ब्रीडामेरकुरजोकुल ग्लेशियरच्या ठिकाणी पोहोचलेल्या पर्यटकांच्या एका समुहावर बर्फाची गुहा कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेत दोन जण बेपत्ता झाले आहेत. रविवारी दुपारी तीन वाजता पोलिसांना दुर्घटनेची माहिती मिळाली होती. अनेक देशांशी संबंधित 25 पर्यटकांचा एक समूह बर्फाच्या गुहांचा शोध घेत असताना ही दुर्घटना घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Advertisement

या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले होते. यातील एकाचा दुर्घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. तर अन्य जखमीला हेलिकॉप्टरद्वारे राजधानी रेक्जानिक येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.  तर बचाव पथक दोन बेपत्ता पर्यटकाचा शोध घेत आहे. धोकादायक परिस्थितीत ही शोधमोहीम काही काळासाठी रोखण्यात आली होती. परंतु सोमवारी ही शोधमोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दुर्घटनेवेळी बहुतांश लोक गुहेबाहेर असल्याने मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिक लोकांकडून सांगण्यात आले.

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article