महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जान्हवीसोबत झळकणार इब्राहिम

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम स्वत:च्या बॉलिवूड पदार्पणावरून चर्चेत आहे. इब्राहिम हा ‘सरजमीं’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. इब्राहिम आता जान्हवी कपूरसोबत दिसून येणार असल्याचे वृत्त आहे. या स्वत:च्या दुसऱ्या चित्रपटात इब्राहिम दोन अभिनेत्रींसोबत झळकणार आहे. जान्हवी आणि महिमा मकवानासोबत तो यात काम करणार आहे. इब्राहिम, जान्हवी आणि महिमाने एका रोमँटिक-कॉम चित्रपटासाठी करार केला आहे. चित्रपटाची कथा आणि कलाकारांची निवड पूर्ण झाली आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरु होणार असल्याचे समजते. या चित्रपटाचे नाव अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहे. या तिन्ही कलाकारांना एका त्रिकोणी प्रेमकहाणीत काम करण्याची संधी मिळाली आहे. हा चित्रपट मॅडॉक आणि धर्मा प्रॉडक्शन्सकडून निर्माण केला जाईल. इब्राहिमने करण जौहरचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला होता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article