For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आयबीसीटी बेळगावकडे रायबाग चषक

10:28 AM Oct 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
आयबीसीटी बेळगावकडे रायबाग चषक
Advertisement

बेळगाव : रायबाग येथे अऊणादेवी पाटील फुटबॉल क्लब आयोजित रायबाग फुटबॉल चॅम्पियन चषक चौथ्या निमंत्रितांच्या आंतरराज्य फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आयबीसीटी बेळगावने रायबागचा 1-0 असा पराभव केला. बेळगावच्या कौशिक पाटीलला उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. रायबागच्या महाकालीन एज्युकेशन सोसायटीच्या मैदानावरती झालेल्या उपांत्यपूर्व  सामन्यात बेळगावच्या आयबीसीटीने चिंचली संघाचा 3-0 असा पराभव केला. या सामन्यात ओमकार गिरीने 2 तर पार्थ देसुरकरने 1 गोल केला. उपांत्य फेरीच्या सामन्यात आयबीसीटी बेळगाव संघाने गडहिंग्लज संघाचा अटीतटीच्या लढतीत 2-1 अशा गोलफरकाने पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात बसवराज व आदित्य यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर गडहिंग्लज तर्फे राकेशने एक गोल केला.

Advertisement

अंतिम सामन्यात आयबीसीटी बेळगाव संघाने रायबाग संघाचा 1-0 असा पराभव केला. या सामन्यात पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे गोलफलक कोराच राहिला. दुसऱ्या सत्रात आयबीसीटाने जोरदार चढाया सुरू केल्या. 36 व्या मिनिटाला पार्थ देसुरकरच्या पासवर कौशिक पाटीलने सुरेख गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर रायबाग संघाने गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. सामन्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आयबीसीटी बेळगाव संघाला 15000 हजार ऊपये रोख आकर्षक चषक तर उपविजेत्या रायबाग संघाला 10000 हजार ऊपये चषक घेऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू कौशिक पाटीलला रोख रक्कम व चषक देण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.