For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘...मी राजीनामा देणार नाही’

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘   मी राजीनामा देणार नाही’
Advertisement

स्वाती मालीवाल यांचा राज्यसभा सदस्यत्व सोडण्यास नकार : मारहाणीच्या प्रकरणानंतर प्रथमच भाष्य : एनआयएला मुलाखत

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

आम आदमी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार स्वाती मालीवाल यांनी गुऊवारी राज्यसभा सदस्यत्व सोडण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. कोणालाही जर राज्यसभेवरील माझ्या जागेची गरज होती तर ती मी स्वेच्छेने दिली असती. पण आता जगातील कोणतीही सत्ता आली तरी मी राजीनामा देणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. राजीनामा देण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जात आहे, पण मी तसे करणार नाही, असे त्यांनी ‘एनआयए’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टपणे सांगितले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर झालेल्या मारहाणीच्या प्रकरणानंतर राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल गुऊवारी पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान त्यांनी विभव कुमार यांच्याशी झालेल्या झटापटीचीही माहिती दिली. मुख्यमंत्री निवासामध्ये विभव कुमार यांनी आपल्याला पाय धरून ओढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आपल्यावर हल्ला झाला तेव्हा मुख्यमंत्रीही आपल्या निवासामध्ये उपस्थित होते असेही स्पष्ट केले. यापूर्वी बुधवारी केजरीवाल यांनी या घटनेच्या वेळी घटनास्थळी आपण हजर नसल्याचे सांगितले होते.

Advertisement

पक्षनेत्यांकडून धमकी

प्राणघातक हल्लाप्रकरणी तक्रार दाखल करण्यास उशीर झाल्याबद्दल स्वाती मालीवाल म्हणाल्या, ‘मला सांगण्यात आले की जर तुम्ही तक्रार दाखल केली तर पक्ष मला भाजपचा एजंट घोषित करेल. घटनेनंतर मी जेव्हा पोलीस स्थानकामध्ये पोहोचले तेव्हा मी रडले. त्यावेळी मला माझ्या फोनवर मीडियाचे अनेक कॉल्स आले. यानंतर पक्षाचे अनेक वरिष्ठ नेते माझ्या घरी येऊन कारवाई करण्याची धमकी देऊन गेले’ असेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांना क्लीनचिट नाही...

विभवकुमार यांनी सात ते आठ वेळा चापट मारली,  पाय ओढले. या झटापटीत माझे डोके टेबलावर आदळले. मी ओरडत असतानाही वाचवण्यासाठी कोणीही आले नाही. या घटनेवर आपण कोणालाही क्लीनचिट देत नसल्याचे स्वाती यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.