मी चौथ्यांदा सावंतवाडीतून आमदारकी लढवणार !
भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी दुसरा मतदारसंघ शोधावा ; ऐन दिवाळीत मंत्री केसरकरांचा विरोधकांवर राजकीय बाँम्ब
सावंतवाडीत आमचं महायुती करण्याचे आधीच ठरले आहे . ज्या विधानसभा मतदारसंघात जे उमेदवार युतीने यापूर्वी निवडून आले आहेत त्यांनाच आता उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे मी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी पुन्हा निवडणूक लढणार आहे. आणि मी महायुतीचाच उमेदवार असणार आहे. मी खासदारकीची निवडणूक लढवणार अशा अफवा आणि खोटा प्रचार करण्यात आला . आता या मतदारसंघासाठी जे इच्छुक होते त्यांनी आता आपला दुसरा मतदार संघ शोधावा असे राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा शिवसेना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत आपली राजकीय भूमिका आज स्पष्ट करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनतेला पुन्हा एकदा मी आमदार म्हणून तुमच्या सेवेत असणार आहे अशी दिवाळी सणाच्या दिनी गिफ्ट दिले . तर राजकीय विरोधकांवर केसरकरांनी बॉम्ब गोळा टाकला आहे. श्री केसरकर आज सावंतवाडीत आले होते . यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गेले काही दिवस माझ्या बाबत खोटा प्रचार केला जात आहे. मी रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची खासदारकीची निवडणूक लढवणार. माझ्या मनात कधी अशी इच्छा आली नव्हती. मी या मतदारसंघात आमदार म्हणूनच जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणार आहे. माझ्या बाबत विरोधकांनी खोटा प्रचार केला . खरंतर आमचं राज्यस्तरावर महायुतीचं पूर्वीच ठरले आहे. जे आमदार महायुतीचे ज्या ज्या मतदारसंघात निवडून आले आहेत त्यांनाच उमेदवारी द्यायची. त्यामुळे मी खासदारकीला सामोरे जाणार हे पूर्णतः खोटे आहे. मी आमदारकीची निवडणूक लढणार आहे. या मतदारसंघातील सर्व विकासकामे आणि जनतेच्या सेवेसाठी मी नेहमीच तत्पर आहे. दर आठवड्याने मी आता मतदार संघातील जनतेच्या विकास कामासाठी आणि अडचणीं सोडविण्यासाठी वेळ देणार आहे. मी मंत्री पदावर आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनेही कामे करणार आहे. तसेच रत्नागिरी मतदारसंघातही मी विकासाच्या दृष्टीने काम करणार आहे. जेणेकरून लोकसभा निवडणुकीत आमच्या महायुतीचा उमेदवार बहुसंख्य मताने निवडून यावा त्यासाठी प्रयत्न करणार आहे. मी माझ्या मतदारसंघातून 50000 मताधिक्य मिळवून देणार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मी आता आमदारकीची निवडणूक लढवणार आहे त्यामुळे ज्यांना या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा आहेत त्यांनी आता दुसरा मतदार संघ निवडावा असेही त्यांनी कुणाचे नाव न घेता महायुतीतील भाजप मित्र पक्षातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना धक्का दिला आहे. श्री केसरकर यांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येलाच आपली राजकीय इच्छा प्रगट करून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅट्रिक साधल्यानंतर चौथ्यांदा निवडणूक लढवण्यास ते इच्छुक असल्याचे स्पष्ट केल्याने आता लवकरच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जाहीर होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.