मालवणात १० सप्टेंबर रोजी ''मी उद्योजक होणार '' व्यवसाय मार्गदर्शन शिबिर
रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदचे आयोजन ; माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांची उपस्थिती.
मालवण प्रतिनिधी
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषद च्या वतीने मी उद्योजक होणार मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मालवण वायरी येथील आर जी चव्हाण सभागृह येथे दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १ या वेळेत करण्यात आले आहे. या वेळी विनामूल्य व्यवसाय मार्गदर्शन आणि शेती कार्यशाळा शिबिराचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. या मार्गदर्शन शिबिराला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू उपस्थित राहणार आहेत.यावेळी या कार्यशाळेमध्ये नैसर्गिक शेती, सेंद्रिय शेती, मार्गदर्शक व व्यवसाय मार्गदर्शक श्री सोम शेखर तसेच अखिल युवा शक्ति महासंघ महाराष्ट्र प्रदेश संस्थापक अध्यक्ष कविराज जाधव, उदोजक सूर्यकांत लाड, उद्योजक डॉक्टर दीपक परब, उद्योजक संजय गावडे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत निवृत्त महानगरपालिका अधिकारी बाळासाहेब गोसावी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्य शाळेचा लाभ घेण्याचे आवाहन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदचे संस्थापक अध्यक्ष श्री श्रीकांत सावंत यांनी केले आहे.