मी माझ्या (पॅंटमध्ये) लघवी करण्यासाठी पैसे दिलेले का?
झोमॅटोच्या सीईओ वर टीका
मुंबई
दिग्गज गायक ब्रायन ॲडम्स यांच्या गाण्याची कॉन्सर्ट मुंबई येथे नुकतीच पार पडली. या कार्यक्रमादरम्यान शेल्डन अरांजो या चाहत्याने मी माझ्या (पॅंटमध्ये) लघवी करण्यासाठी पैसे दिलेले आहेत का असा सवाल करत, झोमॅटोच्या सीईओ दिपेंदर गोयल आणि लिंक्डइनवर मल्टी-सिटी ब्रायन ॲडम्स टूर आयोजित करणाऱ्या EVA ग्लोबल इव्हेंट्सचे प्रमुख यांना एक खुले पत्र लिहिले.
या पत्राद्वारे ते म्हणाले, मी मधुमेहाचा रुग्ण आहे. या कार्यक्रमात एक हजार माणसांमागे फक्त ३ च शौचालयांचे नियोजन असल्याने ते अपुरे पडले. या कार्यक्रमात UPI ऐवजी इव्हेंटच्या आमंत्रणावर रोख रक्कम लोड करण्यासाठी” वेगळ्या यंत्रणेमुळे केवळ वॉशरुममध्येच नव्हे तर फूड स्टॉलवरही गैरव्यवस्थापनाच्या तक्रारी आणि पेमेंट समस्यांच्या तक्रारी त्यांनी ऐकल्या आहेत. तो कोणत्याही वॉशरूममध्ये प्रवेश करू शकत नसल्यामुळे, त्याला शेवटी एका झाडाच्या मागे आराम करावा लागला.
या घटनेची ग्राफिक इमेज असलेली पोस्ट इंटरनेटवर व्हायरल झाल्याने ही घटना चर्चेत आहे.