माझ्याकडे ४० आमदार तीच खरी शिवसेना,एकनाथ शिंदे यांचा दावा, शिंदे आज राज्यपालांना भेटणार
मुंबई: एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांचा आकडा ३५ वरून ४० वर पोहोचला आहे. माझ्याकडे जे शिवसेनेचे आमदार आहेत तीच खरी शिवसेना आहे. असा दावा एकनाथ शिंदे यांनी केलेला आहे. ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन एकनाथ शिंदे (eknath shinde) आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोशारी(rajyapal bhagatsing koshyari) यांना मुंबईत येऊन भेटणार आहेत. अशी माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे (mahavikas aghadi denger zone) सरकार कोसळणार की वाचणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान शिवसेनेला (shivsena) हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे
शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार डावलत असल्याने एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचे चित्र होते. तर हिंदुत्वाच्या मुद्द्यांवरून भाजपसोबत युती करावी असे मत काही आमदारांचे होते. दरम्यान, राज्यसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेत बंडाळी माजली. एकनाथ शिंदे हे ३५ आमदारांना घेऊन भाजपला पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. तर आज सकाळी हा आकडा ३५ वरून ४० वर पोहोचला आहे. आज दुपारपर्यंत एकनाथ शिंदे हे ४० आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन राज्यपालांना भेटणार आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आला असून शिंदे नेमकी काय भूमिका घेणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.