कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आजारात इंग्रजी बोलण्याचा पडला विसर

06:38 AM Jun 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तपासणीत समोर आली मेंदूतील गडबड

Advertisement

एखादा व्यक्ती आजारी पडल्यावर कुठलीही शिकलेली भाषा पूर्णपणे विसरू शकतो का? जगात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर एखादा इसम भाषा बोलण्याची पद्धतच विसरून गेला आहे. असा प्रकार सर्वसाधारणपणे मेंदूच्या एखाद्या हिस्स्यात गडबड झाल्याने घडतो. परंतु आजारी पडल्यावर कुणी पूर्ण भाषाच विसरल्याचे प्रकरण पूर्वी घडले नव्हते. चीनच्या ग्वांगझोउमध्ये 24 वर्षीय महिलेने डॉक्टरांना चकित केले आहे. ही महिला इंग्रजी भाषेत पारंगत होती, परंतु एक दिवशी ती अचानक आजारी पडली आणि इंग्रजी बोलणेच पूर्णपणे विसरून गेली.

Advertisement

ही महिला इंग्रजी विसरली असली तरीही मंदारिन आणि कँटोनीज बोलू शकत होती. इंग्रजी भाषेतील ती एकही शब्द बोलू शकत नसल्याचे आढळून आले. ग्वांगडोंग प्रोव्हिंशियल पीपल्स हॉस्पिटलच्या न्युरोसर्जरी विभागाचे संचालक वान फेंग यांनी हे प्रकरण शेअर केले आहे. महिला एक वर्षापासून विदेशात शिकत होती, तिला इंग्रजी उत्तमप्रकारे अवगत होती. ती इंग्रजी वाचू अन् समजू शकत होती. परंतु आता ती इंग्रजी बोलण्यात असमर्थ ठरली असल्याचे फेंग यांनी सांगितले आहे.

घडलेल्या विचित्र प्रकारानंतर महिलेने त्वरित वैद्यकीय मदत मिळविली. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मेंदूत ट्यूमर असू शकतो, असा डॉक्टरांना संशय होता. तर एमआरआयमधून मेंदूच्या डाव्या क्षेत्रात रक्त वाहत असल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे तिच्या इंग्रजी बोलण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडला होता.

शस्त्रक्रियेनंतर इंग्रजी ज्ञान पूर्ववत

डॉक्टरांनी तिच्यावर शस्त्रक्रिया करत मेंदूवरील दबाव कमी केला. शस्त्रक्रियेनंतर महिलेची इंग्रजी बोलण्याची क्षमता परतली. ती पुन्हा विदेशात स्वत:चे शिक्षण सुरू ठेवू शकली. हा एक वैद्यकीय चमत्कार होता. हे प्रकरण अत्यंत दुर्लभ होते. मेंदूत रक्त वाहणे भाषेला प्रभावित करू शकते. परंतु केवळ एक भाषा प्रभावित करणे असामान्य आहे. महिलेचे मंदारिन आणि कँटोनीज बोलणे सामान्य होते. केवळ इंग्रजी बोलण्यात समस्या होती. न्युरोलॉजीसाठी हे अनोखे प्रकरण होते असे वान फेंग यांनी सांगितले. मेंदूचे विविध हिस्से वेगवेगळ्या भाषांना नियंत्रित करतात. रक्त वाहत असल्याने इंग्रजी बोलण्यासाठी जबाबदार असलेला मेंदूचा हिस्सा प्रभावित झाला. शस्त्रक्रियेमुळे ही समस्या दूर झाली आहे. हे प्रकरण चकित करणारे आहे, कारण महिलेला केवळ इंग्रजी बोलण्यात समस्या जाणवत होती. इंग्रजी वाचण्याच्या किंवा लिहिण्याच्या तिच्या क्षमतेवर कुठलाच प्रभाव पडला नव्हता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article