महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मीच डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार : बिडेन

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्राध्यक्षपद शर्यतीतून बाहेर पडण्यास इन्कार

Advertisement

वृत्तसंस्था /वॉशिंग्टन

Advertisement

अमेरिकेत 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार मीच असेन. तसेच आपल्यावर शर्यत सोडण्यासाठी कोणताही दबाव नाही, असे अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी जाहीर केले आहे.  डेमोक्रॅटिक पक्षाचा उमेदवार बदलला जाण्यासंबंधीच्या चर्चेला बिडेन यांनी पूर्णविराम देतानाच आपल्या विजयाचा दावाही केला आहे. गेल्या गुऊवारी अटलांटा येथे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या अध्यक्षीय चर्चेतील बिडेन यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर मीडिया आणि स्वपक्षियांकडून त्यांच्या निवडणुकीतील विजयाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान बिडेन यांनी आपण उमेदवार म्हणून लढत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निवडणुकीची ही मोहीम खूप मोठी असून आपण कठोर परिश्र्रम सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article