महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

माझ्या भक्तांसाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्षही मीच असतो

06:24 AM Nov 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

श्री नाथमहाराजांना त्यांचे सद्गुरू श्री जनार्दनस्वामीनी ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि सांगितले की, तुझी सद्गुरूसेवा पूर्ण झाली. तू आता समाजातील पात्र व्यक्तींना ब्रह्मज्ञानाचा उपदेश कर. जे अपात्र असतील त्यांना नामस्मरण करायला सांग म्हणजे त्यांची चित्तशुद्धी होईल. त्यांची चित्तशुद्धी झाली की, ते आपणहून अनन्यभावाने शरण येतील मग त्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश कर. भगवंत आणि उद्धव यांचा संवाद पुढे सुरु झाला. भगवंत म्हणाले, पात्र शिष्य कुणाला म्हणावे हे मी तुला आधी सांगितले आहेच. आता अधिकारी स्त्राr कशी ओळखावी तेही सांगतो. काही स्त्रियानी विषयांची आवड त्यागून परमार्थाला आपलेसे केलेले असते. त्यांच्या मनात धनाचा लोभ नसतो. अशा स्त्रिया नि:संशय ब्रह्मज्ञानाच्या उपदेशाच्या अधिकारी असतात. अशा स्त्रियांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला असता कोणताही दोष लागत नाही. तेव्हा आत्तापर्यंत सांगितलेले पात्रतेचे सर्व निकष लाऊन शिष्यांना ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला असता त्यांचे दोषनिवारण होते. हे ब्रह्मज्ञान जाणल्यावर जाणण्यासारखे काही बाकी उरतच नाही.

Advertisement

भगवंतांचे हे बोलणे ऐकल्यावर उद्धवाच्या मनात आणखी एक शंका उत्पन्न झाली. त्याने विचारले, देवा, धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ प्राप्त करण्यासाठी कितीतरी साधने आहेत असे जाणकार सांगतात पण त्या सर्वासाठी तू तर हे एकच साधन सांगितलेस. असे कसे? त्यावर भगवंत हसून म्हणाले, उद्धवा तू ज्या इतर जाणकारांनी सांगितलेल्या अनन्य साधनांबद्दल बोलतोयस ना ती ज्यांचा माझ्या सांगण्यावर विश्वास नसतो अशा अभक्तांसाठी आहेत. माझ्या भक्तांसाठी मी सांगतो तेच एकमेव साधन होय. आता विषय काढलाच आहेस तर, इतर साधनांचीही चर्चा करू. भगवंतांना उद्धवाच्या मनात कोणतीही शंका किंवा किंतु परंतु उरू द्यायचा नव्हता. त्यामुळे उद्धवाला ते आता इतर साधनाविषयी सांगणार आहेत. आपलं सांगणं ऐकणारा कान देऊन ऐकतो आहे म्हंटल्यावर सांगणाऱ्यालाही हुरूप येतो. भगवंतांची परिस्थिती काही वेगळी नव्हती. त्यात चर्चा ब्रह्मज्ञान ह्या त्यांच्या आवडत्या विषयाची चालू होती आणि ऐकणारा भगवंतांच्या सांगण्यातला कण आणि कण टिपून घेणारा उद्धवासारखा श्रोता होता. त्यामुळे ब्रह्मज्ञान ह्या विषयावर किती बोलू आणि किती नको असे भगवंतांना झाले होते. ते म्हणाले, प्रथम तुला कशासाठी कोणते साधन लोक करतात ते सांगतो. मोक्षासाठी ज्ञानसाधना करतात तर धर्मसाधनेसाठी स्वधर्माचरण करतात. मालकी मिळवण्यासाठी दंडधारण करतात उदरनिर्वाहासाठी उद्योग करतात. तर कामभोग मिळवण्यासाठी यज्ञयाग करतात. उद्धवा, अभक्तांच्यासाठी ही सर्व साधने आहेत. ते करत असलेली साधने फलदायी व्हावीत म्हणून त्यांची धडपड चालू असते. ह्यातून त्यांच्या वासना सतत वाढतच असतात. त्यामुळे ज्या पुरुषार्थाच्या पूर्ततेसाठी ते प्रयत्न करत असतात ते सहसा साध्य होत नाहीत. त्यातही विघ्ने निर्माण झाली तर बघायलाच नको. असं सगळं अभक्तांच्या बाबतीत घडतं पण माझ्या भक्तांची गोष्टच वेगळी. त्यांना माझ्याशिवाय अन्य काही दिसतच नाही. त्यांना तू विचारत असलेल्या चारही पुरुषार्थांची काहीच मात्तबरी वाटत नाही. ते फक्त माझे अनन्य भजन करत असतात. त्यांना माहित असतं की, त्यांच्या योगक्षेमाची काळजी मीच वाहणार आहे. त्यामुळे ते पुरुषार्थ साधण्याच्या मागे लागतच नाहीत. अत्यंत भाग्यवान असलेल्या माझ्या भक्तांच्या भाग्याचा हेवा वाटून अनेक देवीदेवता त्यांना शरण येतात तर धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ह्या चारही मुक्ती त्यांचे श्रेष्ठत्व मान्य करून त्यांच्या पाया पडत असतात. उद्धवा जे मला अनन्यशरण आलेले असतात ना, त्यांच्यासाठी धर्म, अर्थ, काम आणि मोक्षही मीच असतो.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article