महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘ह्युंडाई’चा येणार सर्वात मोठा आयपीओ

06:01 AM May 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

25 हजार कोटींची करणार उभारणी : सेबीकडे लवकरच अर्ज

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

ऑटोमोबाईल क्षेत्रातील दक्षिण कोरियन कंपनी ह्युंडाई मोटर भारतीय शेअर बाजारामध्ये लवकरच प्रवेश करण्याची योजना बनवत आहे. कंपनी याकरता भारतीय शेअर बाजारात आपला सर्वात मोठा आयपीओ आणण्याची तयारी करत आहे. याकरिता कंपनीने दोन गुंतवणूक बँकांची निवडसुद्धा केली असल्याचे सांगितले जात आहे.

ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड यांनी आयपीओकरिता कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनले यांची निवड केली आहे. या दोन्ही गुंतवणूक बँका ह्युंडाईला आयपीओ सादर करण्यासाठी आवश्यक ती मदत करणार आहेत. ह्युंडाई कंपनीकडून भारतीय बाजारात आयपीओ आणला गेला तर मूल्याच्या तुलनेत तो सर्वात मोठा ठरू शकतो असे तज्ञांचे म्हणणे आहे.

 किती रक्कम उभारणार

सदरच्या आयपीओ अंतर्गत कंपनी 25 हजार ते 30 हजार कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. आत्तापर्यंत कोणत्याही कंपनीने आयपीओअंतर्गत एवढी मोठी रक्कम उभारली नव्हती. यापूर्वी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी एलआयसी यांनी आयपीओच्या माध्यमातून 21 हजार कोटी रुपयांची उभारणी केली होती.

कधी करणार अर्ज

ह्युंडाई मोटर पुढील महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्यामध्ये शेअर बाजारातील नियामक सेबी यांच्याकडे आपला सविस्तर अर्ज दाखल करू शकते. सेबीकडून सदरच्या अर्जाला मंजुरी मिळाली तर कंपनी आयपीओ लवकरच आणेल.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article