कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ह्युंडाई मोटरने कमावला 1583 कोटी रुपयांचा नफा

06:44 AM May 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मार्च तिमाहीचा निकाल  केला जाहीर

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

Advertisement

चारचाकी वाहन निर्माती कंपनी ह्युंडाई मोटर इंडियाने मार्च अखेरचा तिमाही निकाल जाहीर केला असून नफ्यामध्ये 4 टक्के घसरण कंपनीने नोंदवली आहे. मार्च अखेरच्या तिमाहीत कंपनीने 1583 कोटी रुपये नफा मिळवला आहे. एक वर्षा आधी मार्च तिमाहीअखेर कंपनीने 1649 कोटी रुपयांचा नफा कमवला होता. यासोबत मार्च अखेरच्या तिमाहित कंपनीने 2.5 टक्के वाढीसह 17 हजार 562 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये 17132 कोटी रुपयांचा महसूल कंपनीने प्राप्त केला होता. याच दरम्यान कंपनीने लाभांशाची घोषणा केली असून कंपनीने दिलेल्या माहितीनुसार समभागावर 21 रुपयांचा लाभांश कंपनीने घोषित केला आहे.

आर्थिक वर्षातली कामगिरी

2025 च्या आर्थिक वर्षाचा विचार करता 2024 च्या तुलनेमध्ये महसुलामध्ये 7.7 टक्के वाढ नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025 मध्ये कंपनीने 5492 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. दुसरीकडे निव्वळ नफ्यात आर्थिक वर्षात काहीशी घसरण झाली असून तो 5492 कोटी रुपयांवर राहिला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article