हायड्रो जेल ठरणार सिमेंटला पर्याय
बॅक्टेरियाद्वारे होणार निर्मिती
हायड्रो जेलद्वारे तयार होणार मजबूत घर
वेगाने बदलणारे हवामान, वाढती उष्णता आणि समुद्रकिनारी भागांमध्ये पूराचा धोका अशी अनेक आव्हाने जगासमोर उभी राहिली आहेत. पर्यावरण असंतुलनामुळे निर्माण झालेल्या मोठय़ा संकटाचे प्रमुख कारण सिमेंट-काँक्रिटचा अंदाधुंद वापर आहे. अशा स्थितीत वैज्ञानिकांनी सिमेंटचा पर्याय म्हणून बॅक्टेरियाद्वारे एक हायड्रो जेल तयार केला आहे.
हे जेल पर्यावरणासाठी चांगले असून सिमेंटपेक्षा कितीतरी अधिक स्वस्त आहे. हायड्रो जेल अत्यंत मजबूत असल्याने दर चौरस सेंटीमीटर भागात 380 किलोंचा भार सहजपणे झेलू शकते. म्हणजेच सिमेंट आणि विटांनी तयार केलेल्या घरांऐवजी या जेलने तयार केलेले घर अधिक मजबूत असणार आहे.
बॅक्टेरियाद्वारे निर्मित हायड्रो जेलच्या घरांमध्ये पारंपरिक सिमेंटने तयार घरांपेक्षा कमी गोंगाट निर्माण होणार आहे. हे हायड्रो जेल सिमेंट अन् विटांचेही काम करणार आहे. सिमेंटच्या उलट या जेलच्या निर्मितीत प्रदूषण होत नाही. हे उष्णतेऐवजी बॅक्टेरियाद्वारे फोटोसिंथेसिसमुळे तयार होते. या प्रक्रियेद्वारे हायड्रो जेल तयार केल्याने कार्बन उत्सर्जन होण्याऐवजी तो शोषून घेतला जातो. तर सिमेंट निर्मितीमुळे कार्बन गॅसचे उत्सर्जन होत असते.
अशी होते निर्मिती
बायोक्राँक्रिट किंवा जेल तयार करणारी कंपनी प्रोमेथसचे लॉरेन बर्नेट यांनी हायड्रो जेल निर्मितीची प्रक्रिया अत्यंत सोपी असल्याचे म्हटले आहे. हायड्रो जेल तयार करण्यासाठी प्रकाश उत्सर्जित करणाऱया डायोडद्वारे पाणीने भरलेल्या बायोरिऍक्टर्स टँकमध्ये बॅक्टेरिया तयार केले जातात. त्यांना अकार्बनिक पोषण दिले जाते. टँकला बुडबुडय़ांनी भरून ठेवले जाते, ज्याद्वारे त्यांना कार्बन हायऑक्साइड प्राप्त होतो. दर 4-6 तासांनी बॅक्टेरियांची संख्या दुप्पट होते. त्यांना मग अन्य टँकमध्ये हलविले जाते. तासाभरात क्रिस्टलने भरलेले हायड्रो जेल तयार होते.
कार्बन उर्त्सजन कमी होणार
या जेलला साच्यात ठेवून यंत्राने दाबून काही सेकंद ठेवले जाते. त्यानंतर त्याद्वारे ब्लॉक तयार होण्यास 8 दिवस लागतात. दुसऱया प्रक्रियेत याकरता 28 दिवस लागत होते. वाळूत ही जेल मिसळून सिमेंटसारखा पदार्थ तयार करता येईल. अशाप्रकारे कार्बन उत्सर्जन 90 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकणार आहे. या हायड्रो जेल पुढील वर्षापासून औद्योगिक उत्पादन सुरू होण्याची अपेक्षा आहे.