For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादचा इ‘शान’दार विजय

06:58 AM Mar 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादचा इ‘शान’दार विजय
Advertisement

इशान किशनची नाबाद 106 धावांची खेळी : राजस्थानला धूळ चारत साकारला विजय

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

सामनावीर इशान किशनच्या धमाकेदार शतकाच्या जोरावर सनरायजर्स हैदराबादने पहिल्याच सामन्यात दणदणीत विजय साकारला. इशानच्या शतकी खेळीच्या जोरावर हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 286 धावांचा डोंगर रचला. हैदराबादच्या 287 धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी दमदार फलंदाजी केली खरी, पण राजस्थानला या सामन्यात 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागला.

Advertisement

हैदराबादच्या 287 धावांचा पाठलाग करताना राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल (1) स्वस्तात बाद झाला. कर्णधार रियान परागही सपशेल अपयशी ठरला, नितीश राणाही 11 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर संजू सॅमसन आणि ध्रुव जुरेल यांनी शतकी भागीदारी करत राजस्थानचे आव्हान जिवंत ठेवण्याचा चांगलाच प्रयत्न केला होता. संजू सॅमसनने यावेळी 66 धावांची तुफानी खेळी साकारली, तर जुरेलने यावेळी 70 धावांची धडाकेबाज खेळी केली. पण या दोघांची भागीदारी संपुष्टात आली आणि तिथेच राजस्थानने हा सामना गमवला. सॅमसन व जुरेल बाद झाल्यानंतर हेतमेयरने 23 चेंडूत 42 तर शुभम दुबेने 11 चेंडूत नाबाद 34 धावांची आक्रमक खेळी केली पण हे दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. राजस्थानला 6 बाद 242 धावापर्यंत मजल मारता आली.

हैदराबादची आयपीएलमधील दुसरी सर्वोच्च धावसंख्या

हैदराबादने पुन्हा एकदा आयपीएलमध्ये आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. सनरायझर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. ईशान किशनचे वादळी शतक आणि अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांच्या वादळी सुरूवातीनंतर हैदराबादचे रौद्ररूप पुन्हा पाहायला मिळाले. हैदराबादने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 286 धावा केल्या. हैदराबादच्या टॉप फलंदाजी फळीने रौद्ररूप धारण करत राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांची तुफानी धुलाई केली. आयपीएल इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या 287 धावा आहे, जी देखील हैदराबादच्या नावावर आहे. स्वत:चा विक्रम मोडण्यापासून हैदराबादचा संघ केवळ 1 धाव मागे राहिला. यासह आयपीएल इतिहासातील 3 मोठ्या धावसंख्या उभारण्याचा विक्रम आता सनरायझर्स हैदराबादच्या नावावर आहे.

इशान किशनचे शतक

राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी पाचारण झाल्यावर स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हैदराबादने आपले रंग दाखवले. अभिषेक शर्मा 11 चेंडूत 5 चौकारांसह 24 धावा करून बाद झाला. यानंतर सर्वच संघांसाठी डोकेदुखी असणारा ट्रॅव्हिस हेडने 31 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह 67 धावांची वादळी खेळी साकारली. तो तुषार देशपांडेच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर इशान किशनच्या वादळाने राजस्थानला पळता भुई थोडी केली. इशानने 47 चेंडूंत 11 चौकार आणि 6 षटकारांसह झंझावाती 106 धावांची खेळी केली. सनरायझर्स हैदराबादसाठी पदार्पणातच त्याने पहिले शतक झळकावले. यानंतर नितीश कुमार रे•ाr 15 चेंडूत 4 चौकार आणि एका षटकारासह 30 धावा करत बाद झाला. यानंतर हेन्रिक क्लासेननेही आपला क्लास दाखवला. क्लासेनने 14 चेंडूत 5 चौकार आणि एका षटकारासह 34 धावांचे योगदान दिले. यामुळे हैदराबादने 20 षटकांत 6 बाद 286 धावांचा डोंगर उभा केला.

संक्षिप्त धावफलक

सनरायजर्स हैदराबाद 20 षटकात 6 बाद 286 (अभिषेक शर्मा 24, ट्रेव्हिस हेड 67, इशान किशन नाबाद 106, नितीश कुमार रे•ाr 30, क्लासेन 34, तुषार देशपांडे 3 तर थिक्षणा 2 बळी)

राजस्थान रॉयल्स 20 षटकात 6 बाद 242 (संजू सॅमसन 66, जैस्वाल 1,

ध्रुव जुरेल 70, हेतमेयर 42, शुभम दुबे नाबाद 34, सिमरनजित सिंग व हर्षल पटेल प्रत्येकी दोन बळी).

आयपीएलमध्ये एकाच डावात सर्वाधिक धावा करणारे संघ

  1. 3/287 - हैदराबाद वि आरसीबी, 2024
  2. 6/286 - हैदराबाद वि राजस्थान, 2025
  3. 3/277 - हैदराबाद वि मुंबई, 2024.

Advertisement
Tags :

.