लखनौसमोर आज हैदराबादच्या आक्रमक फलंदाजीचा धोका
वृत्तसंस्था/ हैदराबाद
पहिल्या सामन्यात पराभव पत्करल्यानंतर रिषभ पंतच्या लखनौ सुपर जायंट्सला आज गुऊवारी येथे इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार असून यावेळी हैदराबादच्या अतिआक्रमक फलंदाजीच्या बाबतीत त्यांना सावधगिरी बाळगावी लागेल.
गेल्या वर्षीच्या उपविजेत्या हैदराबादने पहिल्या सामन्यात आयपीएलमधील सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मोडीत काढण्याच्या जवळ पोहोचताना राजस्थान रॉयल्सचा 44 धावांनी पराभव केला. या मोठ्या विजयामुळे ते सर्वोत्तम नेट रन रेटनिशी गुणतक्त्यावर अव्वल स्थानावर पोहोचले आहेत. अष्टपैलू खेळाडूंची पदरी असलेली ताकद पाहता पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघ त्यांचे वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. हैदराबादच्या संघात नव्याने सामील झालेल्या इशान किशनने राजस्थानविरुद्ध शतक झळकावले आणि इतर मोठ्या खेळाडूंनीही नेहमीप्रमाणे जोरदार खेळी केल्या.
हैदराबादच्या फलंदाजीची पद्धत प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरू शकते. शिवाय उल्लेखनीय सातत्य त्यांनी दाखविले आहे. त्यांच्या प्रमुख शस्त्रांमध्ये अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासेन यांचा समावेश असून त्याश किशनची भर हा आणखी एक मास्टरस्ट्रोक ठरला आहे. याशिवाय नितीशकुमार रे•ाrनेही राजस्थान रॉयल्सविऊद्ध धावा केल्या. मुंबई इंडियन्सने सोडल्यानंतर किशनने आयपीएलमधील आपले पहिले शतक सदर सामन्यात पूर्ण केले आणि 47 चेंडूंत नाबाद 106 धावा करताना सहा षटकार आणि 11 चौकार फटकावले.
अशा परिस्थितीत एलएसजीने स्पष्ट गोलंदाजी योजना आखण्याची आवश्यकता आहे. कारण आयपीएलमध्ये अगदी लहान चूक देखील महागात पडते. पहिल्या पाच सामन्यांमध्येच 119 षटकार खेचले गेले आहेत. दिल्ली कॅपिटल्सविऊद्ध एका गड्याने पराभव पत्कराव्या लागलेल्या एलएसजीनेही फलंदाजी करताना असाच दृष्टिकोन दाखवला होता. परंतु मधल्या षटकांमध्ये त्यांचा मार्ग चुकला आणि ते महागात पडले. एलएसजीने दिल्ली कॅपिटल्सविऊद्धच्या शेवटच्या आठ षटकांमध्ये सहा गडी गमावले आणि फक्त 76 धावा जोडल्या. तसेच सुऊवातीच्या बळी मिळवूनही दिल्लीच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या आक्रमणाला थोपणे लखनौला शक्य झाले नाही.
एलएसजीचा नवीन कर्णधार पंत पहिल्या सामन्यात सहा चेंडूत एकही धाव न काढता परतला. त्यांच्या निकोलस पूरनने चांगली फटकेबाजी, परंतु त्यादृष्टीने खरी दिशा या आयपीएलमध्ये फक्त एक फलंदाज म्हणून खेळणाऱ्या मिशेल मार्शने निश्चित केली होती. एलएसजीला वाटेल की, त्यांनी दिल्लीविरुद्धच्या सामन्यात जास्त काही चुकीचे केले नाही. परंतु त्यांना हे पक्के माहीत असेल की हैदराबादविरुद्ध त्यांना गोलंदाजीत चांगले प्रदर्शन घडवावे लागेल. वरिष्ठ फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या व्यतिरिक्त एलएसजीला मणिमरन सिद्धार्थ आणि दिग्वेश राठी या जोडीकडूनही मोठ्या आशा असतील. शार्दुल ठाकूरने दिल्लीविरुद्ध दोन बळी मिळवूनही एलएसजीने या वरिष्ठ अष्टपैलू खेळाडूला पुढे का वापरले नाही हे अनाकलनीय आहे. याबाबतीत लखनौकडून चांगल्या योजनांची आज अपेक्षा केली जाईल.
संघ-सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), इशान किशन, अथर्व तायडे, अभिनव मनोहर, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, विआन मुल्डर, अभिषेक शर्मा, नितीशकुमार रे•ाr, मोहम्मद शमी, राहुल चाहर, अॅडम झॅम्पा, सिमरजित सिंग, झीशान अन्सारी, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा.
लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), डेव्हिड मिलर, एडन मार्करम, आर्यन जुयाल, हिम्मत सिंग, मॅथ्यू ब्रेट्झके, निकोलस पूरन, मिचेल मार्श, अब्दुल समद, शाहबाज अहमद, युवराज चौधरी, राजवर्धन हंगरगेकर, अर्शिन कुलकर्णी, आयुष बडोनी, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, मनिमारन सिद्धार्थ, दिग्वेश राठी, आकाश सिंग, शामर जोसेफ, प्रिन्स यादव, मयंक यादव, रवी बिश्नोई.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.