हैदराबादचा सामना आज राजस्थानशी
वृत्तसंस्था/ हैदराबाद
गेल्या हंगामातील उपविजेता सनरायझर्स हैदराबाद आज रविवारी राजस्थान रॉयल्सचा त्यांच्या पहिल्या इंडियन प्रीमियर लीग सामन्यात मुकाबला करणार असून संतुलित संघात जबरदस्त फलंदाज आणि अनुभवी गोलंदाजांचा समावेश असल्याने हैदराबादचे पारडे जड वाटत आहे.
सनरायझर्सकडे काही सर्वांत स्फोटक फलंदाज आहेत, ज्यात ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांचा समावेश होतो. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील खेळपट्टीवर भरपूर धावा निघण्याची शक्यता असल्याने दुपारच्या सामन्यात त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा असेल. दुखापतीनंतर भारताचा अष्टपैलू खेळाडू नितीशकुमार रे•ाr परतल्याने सनरायझर्सच्या शस्त्रागारात भर पडली आहे. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर वगळता रॉयल्सच्या गोलंदाजी विभागात फारशी प्रस्थापित नावे असल्याने रविवारी प्रथम फलंदाजी केल्यास सनरायझर्स 250 पेक्षा जास्त धावा करू शकतात.
कर्णधार पॅट कमिन्स आणि मोहम्मद शमी ही अनुभवी वेगवान जोडी हैदराबादच्या गोलंदाजी विभागाची जबाबदारी सांभाळेल. तसेच आणखी एक अनुभवी गोलंदाज अॅडम झॅम्पाच्या रुपाने त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे, बोटाच्या दुखापतीमुळे राजस्थनला कर्णधार संजू सॅमसनची उणीव भासेल. पहिल्या तीन आयपीएल सामन्यांमध्ये रियान पराग हा त्यांचा अंतरिम कर्णधार असेल. इंग्लिश खेळाडू जोस बटलर संघाबाहेर पडल्याने त्यांच्या फलंदाजीची ताकद कमी झाली असली, तरी त्यांच्याकडे अजूनही शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, नितीश राणा आणि यशस्वी जैस्वालसारखे खेळाडू आहेत.
संघ : सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन, अभिषेक शर्मा, सचिन बेबी, मोहम्मद शमी, अॅडम झॅम्पा, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, राहुल चाहर, इशान मलिंगा, हर्षल पटेल, कामिंदू मेंडिस, वियान मुल्डर, नितीशकुमार रे•ाr, अथर्व तायडे, ब्रायडन कार्से, सिमरजित सिंग, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी.
राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार), संजू सॅमसन, शुभम दुबे, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, नितीश राणा, कुणाल सिंह राठोड, वैभव सूर्यवंशी, वानिंदू हसरंगा, जोफ्रा आर्चर, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, फजलहक फारूखी, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, क्वीना मफाका, संदीप शर्मा, महेश थीक्षाना, युधवीर सिंग.
सामन्याची वेळ : दुपारी 3:30 वा.