For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सातत्य गमावलेल्या हैदराबादचा आज लखनौशी मुकाबला

06:48 AM May 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सातत्य गमावलेल्या हैदराबादचा आज लखनौशी मुकाबला
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद आज बुधवारी येथे होणार असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या महत्त्वपूर्ण सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना करणार असून यावेळी मागील सामन्यातील खराब फलंदाजीतून बाहेर सरून सुधारित कामगिरी घडविण्यास ते उत्सुक असतील. दोन्ही संघांचे 11 सामन्यांतून 12 गुण झालेले असून धावसरासरीच्या बाबतीत लखनौच्या तुलनेत (उणे 0.371) हैदराबाद (उणे 0.065) किंचित सरस आहेत.

गुणतालिकेतील अव्वल चार स्थाने मिळविण्यासाठीच्या तीव्र स्पर्धेत सध्या सनरायझर्स सापडलेला असून कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे त्यांच्याहून वरच्या स्थानावर आहेत. आजच्या सामन्यातील विजेते प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने नक्कीच मोठी झेप घेतील. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाकडे पुरेशी प्रतिभा आहे, परंतु अलीकडेच त्यांना विजयाची नोंद करता आलेली नाही. सनरायझर्सने त्यांच्या मागील चार सामन्यांपैकी तीन सामने गमावले आहेत. याचे मुख्य कारण त्यांच्या विध्वंसक फलंदाजीला अपेक्षेनुरुप कामगिरी करता न येणे हे आहे. मुंबई इंडियन्सविऊद्धच्या मागील सामन्यात हैदराबाद संघ सात गड्यांनी पराभूत झाला. ते मोठे लक्ष्य मुंबईसमोर ठेवण्यात अपयशी ठरले.

Advertisement

ट्रॅव्हिस हेड वगळता संघातील इतर फलंदाजांना अलीकडे घसरणीचा सामना करावा लागला आहे. आपल्या पॉवर हिटिंग क्षमतेचे प्रदर्शन केल्यानंतर युवा सलामीवीर अभिषेक शर्माला गेल्या चार सामन्यांमध्ये फक्त एकदाच 30 धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. हेन्रिक क्लासेनलाही सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही आणि नितीश रे•ाrही गडबडला आहे. हैदराबादच्या गोलंदाजांनी त्यांच्या फलंदाजांच्या तुलनेत चांगली कामगिरी केली आहे. टी. नटराजनने सातत्य राखले आहे, तर अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारलाही सूर गवसला आहे.

दुसरीकडे, एलएसजीचे कोलकाता नाईट रायडर्सविऊद्धचे प्रदर्शन निराशाजनक राहिले. एकना स्टेडियमवर त्यांनी प्रथमच प्रतिस्पर्ध्यांना 200 पेक्षा जास्त धावसंख्या उभारू दिली तसेच त्यांचा डाव 137 धावांत गुंडाळला. त्या दिवशी कर्णधार के. एल. राहुल डावाचा पाया घालण्यात अयशस्वी ठरला तसेच मार्कस स्टॉइनिस आणि निकोलस पूरन या खेळाडूंना आवश्यकतेनुसार फटकेबाजी करता आली नाही. त्यांच्या आयुष बडोनीने या आयपीएलमध्ये कमी धावा केल्या आहेत आणि तो आपली कामगिरी आज सुधारण्यास उत्सुक असेल.

एलएसजीच्या वेगवान माऱ्याची धार कमी झाल्यामुळे त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. वेगवान गोलंदाज मयंक यादव आयपीएलमधून बाहेर पडला आहे आणि डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान देखील दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक, युवा यश ठाकूर, स्टॉइनिस आणि फिरकी गोलंदाज कृणाल पंड्या आणि रवी बिश्नोई यांच्यावर सारी जबाबदारी असेल. .

संघ : सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, अब्दुल समद, नितीश रे•ाr, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, जाथवेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फाऊकी, मार्को जेनसेन, आकाश महाराज सिंह, मयंक अग्रवाल.

लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, दीपक हुडा, आयुष बडोनी, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, कृणाल पंड्या, रवी बिश्नोई, मोहसीन खान, शमर जोसेफ, यश ठाकूर, मणिमरन सिद्धार्थ, प्रेरक मंकड, अर्शद खान, कृष्णप्पा गौतम, अमित मिश्रा, काइल मेयर्स, अॅश्टन टर्नर, मॅट हेन्री, नवीन-उल-हक, देवदत्त पडिक्कल, युधवीर सिंह चरक, मयंक यादव, अर्शीन कुलकर्णी.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.