For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबाद आज ‘प्लेऑफ’मधील स्थानाच्या मोहिमेवर, गुजरातशी सामना

06:55 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
हैदराबाद आज ‘प्लेऑफ’मधील स्थानाच्या मोहिमेवर  गुजरातशी सामना
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

सनरायझर्स हैदराबाद इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज गुरुवारी येथे होणाऱ्या सामन्यात गुजरात टायटन्सशी मुकाबला करणार असून यावेळी प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील. याकामी विध्वंसक फलंदाजीची फळी पुन्हा साथ देईल अशी आशा त्यांना असेल. आणखी एक विजय सनरायझर्सला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यास पुरेसा ठरेल. कारण पात्रता सुनिश्चित करण्यासाठी त्यांना फक्त एक गुण आवश्यक आहे.

परंतु पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाची अव्वल दोन स्थानांवरही नजर असेल. या सामन्यानंतर त्यांच्याकडे आणखी एक सामना असून 0.406 अशी निव्वळ धावसरासरी त्यांच्याकडे असल्याने अव्वल दोन स्थानांत राहणे त्यांच्यासाठी अशक्य नाही. त्यांचे 12 सामन्यांमधून 14 गुण झाले आहेत आणि ते जास्तीत जास्त 18 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. जर इतर निकाल त्यांना हवे तसे आले, तर पहिल्या दोन स्थानांवरील संघांमध्ये राहण्याच्या दृष्टीने ते त्यांना पुरेसे ठरू शकते.

Advertisement

गुजरातविऊद्धच्या लढतीपूर्वी सनरायझर्सच्या खेळाडूंना एक आठवडा विश्रांती मिळालेली आहे. शिवाय 8 मे रोजी लखनौ सुपर जायंट्सविऊद्ध आणखी एक विक्रमी विजय मिळविल्याने त्यांचे मनोबलही उंचावले आहे. हैदराबादने संपूर्ण मोसमात अविश्वसनीय विजय मिळवून दाखविलेले ओत. परंतु या स्पर्धेत यापूर्वी त्यांना काही मोठ्या पराभवांनाही सामोरे जावे लागलेलें असून गुजरातने 7 गडी राखून त्यांच्यावर मिळविलेला विजय हा त्यापैकीच एक आहे.

फलंदाजांच्या अतिआक्रमक दृष्टिकोनातून एक तर हैदराबादने कमालीची चांगली कामगिरी केली आहे किंवा त्यांना निराश तरी व्हावे लागले आहे. मागील पाच सामन्यांमध्ये तीन वेळा त्यांना पराभव पत्करावा लागलेला असून त्यात आरसीबी (35 धावांनी), सीएसके (78 धावांनी) आणि मुंबई इंडियन्स (7 गड्यांनी) यांच्याविरुद्धच्या लढतींचा समावेश होतो. सनरायझर्स ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे किती स्फोटक सुऊवात करून देतात त्यावर खूप अवलंबून आहेत. खास करून लक्ष्याचा पाठलाग करताना डावाची उभारणी त्यांना अधिक चांगल्या प्रकारे करावी लागेल. याकामी नितीश रे•ाr, हेन्रिक क्लासेन आणि अब्दुल समद यासारख्यांनी अधिक योगदान देण्याची गरज आहे.

 )

दुसरीकडे, टायटन्सला 13 सामन्यांत पाच विजय मिळाले आहेत आणि 11 गुण झाले आहेत. ते शर्यतीतून बाहेर पडले आहेत, त्यांची गोलंदाजी या हंगामात तितकी प्रभावी ठरलेली नाही. फलंदाजीत कर्णधार शुभमन गिल व बी. साई सुदर्शन यांच्यावर बरेच काही अवलंबून असेल, त्यांच्याकडे डेव्हिड मिलरसारखा फटकेबाज असला, तरी त्याला यंदा सूर सापडू शकलेला नाही.

संघ-सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, जाथवेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फाऊकी, मार्को जेनसेन, आकाश महाराज सिंह, मयंक अग्रवाल.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहऊख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर आणि बी. आर. शरथ.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.