कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हैदराबाद-दिल्ली सामना पावसामुळे रद्द

06:58 AM May 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण

Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

सनरायजर्स हैदराबाद व दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यातील सामना पाऊस आणि ओल्या खेळपट्टीमुळे पहिल्या डावानंतर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण देण्यात आला असल्याची माहिती आयपीएलने सोशल मीडियावरुन दिली. यासह सनरायजर्स हैदराबादचे या मोसमातील आव्हान संपुष्टात आले आहे. दरम्यान, हैदराबाद राजस्थान आणि चेन्नईनंतर या स्पर्धेतून बाहेर पडणारी तिसरी टीम ठरली आहे.  तसेच आयपीएलच्या 18 व्या मोसमात सामना पावसामुळे रद्द होण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. याआधी 26 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यातील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.

प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 7 विकेट्स गमावल्यानंतर 133 धावा केल्या. यामध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या पहिल्या पाच फलंदाजांची एकही चालली नाही आणि पहिले चार फलंदाज एकेरी अंकामध्ये पॅव्हेलियनमध्ये परतले. दिल्लीकडून ट्रिस्टन स्टब्जने सर्वाधिक 41 धावांची खेळी साकारली तर आशुतोष शर्माने 41 धाव फटकावल्या. यानंतर हैदराबादच्या डावात पावसाला सुरुवात झाल्याने खेळ थांबवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत पाऊस न थांबल्याने तसेच ओल्या खेळपट्टीमुळे पंचांनी शेवटी हा सामना रद्द केला. यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी एकेक गुण मिळाला. दुसरीकडे, प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी दिल्लीला आता उर्वरित सामन्यात मोठ्या विजयाची गरज आहे. हैदराबादचे मात्र स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharat_official#tarunbharatnews
Next Article