For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हैदराबादचा पंजाबवर 2 धावांनी थरारक विजय

06:58 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
हैदराबादचा पंजाबवर 2 धावांनी थरारक विजय
Advertisement

सामनावीर नितीशकुमार रेड्डीचे अर्धशतक, शशांक सिंग-आशुतोष शर्माचे प्रयत्न, अर्शदीप सिंगची कामगिरी वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ मुलानपूर

नितीशकुमार रेड्डीच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्ज इलेव्हन पंजाबवर केवळ 2 धावांनी थरारक विजय मिळविला. हैदराबादला पंजाबने विजयासाठी 183 धावांचे आव्हान दिले. हैदराबादने 20 षटकात 9 बाद 182 धावा जमविल्या. त्यानंतर पंजाबने 20 षटकात 6 बाद 180 धावापर्यंत मजल मारली. शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांचे प्रयत्न अपुरे ठरले. स्पर्धेच्या गुणतक्त्यात हैदराबाद संघाने 5 सामन्यांतून 6 गुणांसह 5 वे स्थान तर पंजाबने 4 गुणांसह 6 वे स्थान राखले आहे.

Advertisement

पंजाबच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर कमिन्सने बेअरस्टोचा शुन्यावर त्रिफळा उडविला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारने प्रभसिमरन सिंगला 4 धावांवर झेलबाद केले. कर्णधार शिखर धवन भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका मारण्याच्या नादात क्लासेनकरवी यष्टीचीत झाला. त्याने 16 चेंडूत 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. नटराजनच्या गोलंदाजीवर कमिन्सने सॅम करनचा अप्रतिम झेल टिपला. त्याने 22 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 29 धावा जमविल्या. उनादकटने सिकंदर रझाला झेलबाद केले. त्याने 22 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 28 धावा जमविल्या. पंजाबची यावेळी स्थिती 5 बाद 91 अशी होती. नितीशकुमार रेड्डीने जितेश शर्माला झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह 19 धावा जमविल्या. पंजाबला यावेळी विजयासाठी 27 चेंडूत 69 धावांची जरुरी होती. आणि त्यांचे 4 गडी खेळावयाचे होते.

शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यांनी प्रयत्नांची शिकस्त करत आपल्या संघाला विजयाच्या आशा निर्माण करून दिल्या. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी या जोडीला शेवटच्या षटकात विजयापासून वंचित केल्याने पंजाबला हा सामना केवळ 2 धावांनी गमवावा लागला. शशांक सिंगने 25 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह नाबाद 46 तर आशुतोष शर्माने 15 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 33 धावा फटकावल्या. पंजाबला अवांतर 7 धावा मिळाल्या. त्यांच्या डावात 8 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारने 2 तर कमिन्स, टी. नटराजन, रे•ाr, उनादकट यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

पंजाबने पॉवरप्लेच्या 6 षटकात 27 धावा जमविताना 3 गडी बाद गमविले. पंजाबचे अर्धशतक 50 चेंडूत, शतक 87 चेंडूत तर दीडशतक 112 चेंडूत फलकावर लागले. शशांक सिंग आणि शर्मा यांनी 7 व्या गड्यासाठी अर्धशतकी भागिदारी 23 चेंडूत नोंदविली.

रेड्डीची फटकेबाजी

तत्पूर्वी या सामन्यात पंजाब संघाने नाणेफेक जिंकून हैदराबादला प्रथम फलंदाजी दिली. हेड आणि अभिषेक शर्मा या सलामीच्या जोडीने 20 चेंडूत 27 धावांची भागिदारी केली. अर्शदीप सिंगने हेडला धवनकरवी झेलबाद केले. त्याने 15 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा जमविल्या. अर्शदीप सिंगने आपल्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर हेडला बाद केल्यानंतर चौथ्या चेंडूवर मार्करमला खाते उघडण्यापूर्वीच तंबुचा रस्ता दाखविला. सॅम करनने अभिषेक शर्माला झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 16 धावा जमविल्या. हर्षल पटेलने राहूल त्रिपाठीला शर्माकरवी झेलबाद केले. त्याने 14 चेंडूत 1 चौकारासह 11 धावा जमविल्या. पटेलने हैदराबादला आणखी एक धक्का देताना क्लासेनला झेलबाद केले. त्याने एक चौकारासह 9 धावा जमविल्या. हैदराबादची यावेळी स्थिती 5 बाद 100 अशी होती. नितीशकुमार रे•ाr आणि अब्दुल समद येंनी सहाव्या गड्यासाठी 20 चेंडूत 50 धावांची भागिदारी केल्याने हैदराबादला 182 धावापर्यंत मजल मारता आली. अ अर्शदीप सिंगने समदला झेलबाद केले. त्याने 12 चेंडूत 5 चौकारांसह 25 धावा जमविल्या. नितीशकुमार रे•ाrने 37 चेंडूत 5 षटकार 4 चौकारांसह 64 धावा जमवित तो सातव्या गड्याच्या रुपात तंबुत परतला. अर्शदीप सिंगने रे•ाrला रबाडाकरवी झेलबाद केले. कर्णधार पॅट कमिन्स केवळ 3 धावांवर त्रिफळाचीत झाला. भुवनेश्वरकुमारने 6 धावा जमविल्या. शाहबाज अहमद 1 षटकार आणि 1 चौकारासह 14 धावावर तर उनादकट 6 धावावर नाबाद राहिले. उनादकटने डावातील शेवटच्या चेंडूवर षटकार खेचला. हैदराबादच्या डावात 8 षटकार आणि 18 चौकार नोंदविले गेले. हैदराबादला अवांतर 7 धावा मिळाल्या. पंजाबतर्फे अर्शदीप सिंगने 29 धावात 4 तर सॅम करन आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी 2 तसेच रबाडाने 1 गडी बाद केला.

या सामन्यात हैदराबादने पॉवरप्लाच्या 6 षटकात 40 धावा जमविताना 3 गडी गमविले. हैदराबादचे अर्धशतक 43 चेंडूत, शतक 77 चेंडूत, दीडशतक 97 चेंडूत फलकावर लागले. नितीशकुमार रे•ाrने आपले अर्धशतक 32 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने झळकविले. या सामन्यात हैदराबाद संघाने ट्रेव्हिस हेडच्या जागी राहुल त्रिपाठीला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले.

संक्षिप्त धावफलक - सनरायझर्स हैदराबाद 20 षटकात 9 बाद 182 (नितीशकुमार रे•ाr 64, हेड 21, अभिषेक शर्मा 16, राहुल त्रिपाठी 11, क्लासेन 9, अब्दुल समद 25, शाहबाज अहमद नाबाद 14, कमिन्स 3, भुवनेश्वर कुमार 6, उनादकट नाबाद 6 अवांतर 7, अर्शदीप सिंग 4-29, सॅम करन 2-41, हर्षल पटेल 2-30, रबाडा 1-32), किंग्ज इलेव्हन पंजाब 20 षटकात 6 बाद 180 (शशांक सिंग नाबाद 46, आशुतोष शर्मा नाबाद 33, जितेश शर्मा 19, सिकंदर रझा 28, सॅम करन 29, बेअरस्टो 0, धवन 14, अवांतर 7, भुवनेश्वर कुमार 2-32, कमिन्स, टी. नटराजन, नितीशकुमार रे•ाr, उनादकट प्रत्येकी 1 बळी).

......

Advertisement
Tags :

.