For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पंजाबविरुद्ध आज हैदराबादचे दुसरे स्थान पटकावण्याचे लक्ष्य

06:50 AM May 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
पंजाबविरुद्ध आज हैदराबादचे  दुसरे स्थान पटकावण्याचे लक्ष्य
Advertisement

वृत्तसंस्था/ हैदराबाद

Advertisement

तीन वर्षांत पहिल्यांदा प्लेऑफचा टप्पा गाठल्यानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या सनरायझर्स हैदराबादचा आज रविवारी येथे अंतिम लीग सामन्यात पंजाब किंग्जशी सामना होणार असून यावेळी आयपीएल गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. सनरायझर्स हैदराबादला आयपीएलच्या मागील तीन स्पर्धांत तळाकडील स्थान मिळाले होते, पण यंदा त्यांनी त्यांची अतिआक्रमक फलंदाजी आणि कुशल गोलंदाजीच्या साहाय्याने स्वत:ला विजेतेपदाचे भक्कम दावेदार म्हणून प्रस्थापित केलेले आहे.

येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील गुजरात टायटन्सविऊद्धचा सामना पावसात वाहून गेल्यानंतर पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाने अंतिम चार संघांमध्ये प्रवेश केला. 13 सामन्यांतून 15 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेल्या सनरायझर्सने आज रविवारी पंजाबला नमविल्यास ते 17 गुणांपर्यंत पोहोचू शकते. तथापि, संघर्ष करत असलेल्या राजस्थान रॉयल्सने शेवटच्या साखळी सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला हरवण्यात यश मिळवले, तर संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघ सनरायझर्सला मागे टाकून 18 गुणांसह दुसरे स्थान मिळवेल.

Advertisement

तिसऱ्या क्रमांकावर असलेले सनरायझर्स त्यांच्या मागील सहा सामन्यांमध्ये काहीसे दुर्दैवी ठरले आहेत. त्यांनी फक्त दोन सामने जिंकले आहेत, तर तीन गमावले आहेत आणि एक सामना पावसात वाहून गेला. ते ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या स्फोटक सलामीच्या जोडीवर कमालीचे अवलंबून असून त्यांच्या इतर फलंदाजांना देखील फॉर्म मिळणे महत्वाचे आहे. दुसरीकडे पंजाबने त्यांच्या इंग्लंडच्या खेळाडूंची सेवा गमावली आहे, ज्यात हंगामी कर्णधार सॅम करनचा समावेश आहे. करन इंग्लंडच्या संघातर्फे खेळण्यासाठी मायदेशी परतल्याने भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज जितेश शर्मा हंगामातील त्यांच्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जचे नेतृत्व करेल.

संघ : सनरायझर्स हैदराबाद :  पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, हेन्रिक क्लासेन, एडन मार्करम, अब्दुल समद, नितीश , शाहबाज अहमद,, भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी. नटराजन, मयंक मार्कंडे, उमरान मलिक, अनमोलप्रीत सिंग, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, उपेंद्र यादव, झाथवेध सुब्रमण्यन, सनवीर सिंग, विजयकांत व्यासकांत, फजलहक फाऊकी, मार्को जेनसेन, आकाश महाराज सिंह, मयंक अग्रवाल.

पंजाब किंग्ज: जितेश शर्मा (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, सिकंदर रझा, ऋषी धवन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कवेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.

सामन्याची वेळ : दुपारी 3.30 वा.

Advertisement
Tags :

.