कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पत्नी,मुलीच्या खूनप्रकरणी पती दोषी

01:07 PM May 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

नैराश्येतून लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण करुन पत्नी व मुलगीचा खून करणाऱ्या पतीस जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी दोषी ठरविले. अजित सिताराम शिंदे (वय 43 रा. जुने पारगांव ता. हातकणंगले) असे आरोपीचे नाव आहे, शुक्रवार 9 मे रोजी शिक्षा सुनावण्याचा निर्णय दिला. अॅङ विवेक शुक्ल यांनी सरकारी वकील म्हणून काम पाहिले. पत्नी दिपाली अजित शिंदे (वय 25), मुलगी वैभवी अजित शिंदे (वय 10 ) अशी मृतांची नावे आहेत.

Advertisement

अजित शिंदे हा पत्नी, मुलगी आणि मुलग्यासोबत राहत होता.  तो कामधंदा करत नव्हता. यातून त्याला नैराश्य आले होते. यामुळे अजित व पत्नी दिपाली यांच्यामध्ये वारंवार वाद होत होते. 6 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी 8 वाजता या दोघांमध्ये वाद झाला. पत्नी दिपाली हिने सकाळी लवकर नाष्टा दिला नाही तसेच मुलगी वारंवार बाहेर खेळायला जाते या कारणातून अजितने या दोघींसह मुलगा प्रेम अशा तिघांना कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये तिघेही गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत या तिघांना अजितने सिपीआर रुग्णालयात दाखल केले. याच दिवशी रात्री जखमी दिपाली हिचा मृत्यू झाला. तर आठच दिवसात मुलगी वैभवी हिचाही मृत्यू झाला, मात्र यातून प्रेम बचावला. यानंतर मधुसुदन कांबळे यांनी याबाबतची फिर्याद वडगांव पोलीस ठाण्यात दिली. यानुसार अजित शिंदे याच्या खूनाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक यशवंत गवारी यांनी याबाबतचा तपास करुन अजित शिंदे याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक 3 यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे 16 साक्षीदार तपासण्यात आले, तसेच वैद्यकीय अधिकारी विजयकुमार गाढवे यांची साक्ष मोलाची ठरली. सरकारी वकील अॅड. विवेक शुक्ल यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने अजित शिंदे यास दोषी ठरविले. मात्र याबाबतचा निकाल न्यायालयाने राखून ठेवला असून, शुक्रवार (9 मे) रोजी शिक्षेची सुनावणी होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article