पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या
वार्ताहर/विजापूर
कुटुंबातील भांडणे, छळ सहन न झाल्याने पतीने पत्नीचा साडीने गळा आवळून हत्या केली. यानंतर स्वत:ही झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवन संपविल्याची घटना घडली आहे. विजापूर जिह्यातील मुद्देबिहाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गेद्दलमरी गावात ही घटना घडली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. मेघा ऊर्फ मनम्मा हरनाळ (होसमणी वय 28) व सिद्धप्पा मल्लप्पा हरनाळ (वय 33) अशी त्यांची नावे आहेत. सिद्धप्पा याने पत्नी मेघा ऊर्फ मनम्मा हिचा तिच्याच साडीने गळा आवळून खून केला व नंतर स्वत: शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. यादगीर जिह्यातील हुनसगी तालुक्यातील एन्नीवाडीगेरी गावातील मनम्माची आई गद्देम्मा बसप्पा होसमनी हिने मंगळवारी मुद्देबिहाळ पोलिसात तक्रार दिली आहे. जावई सिद्धप्पा व मुलगी मेघा यांना दीर श्रीकांत मल्लप्पा हरनाळ आणि सासू शांतम्मा मल्लप्पा हरनाळ यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. विजापूरचे एसपी लक्ष्मण निंबरगी, बसवणबागेवाडीचे डीएसपी बल्लप्पा नंदगावी, मुद्देबिहाळचे सीपीआय मेहमूद फसिउद्दीन आणि पीएएस संजय तिप्पारेडू यांनी घटनास्थळी भेट दिली असून अधिक तपास हाती घेतला आहे.