महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुसऱ्या लग्नासाठी आपल्या पहिल्या पत्नीचा खाजगी व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करणारा पती अटकेत

02:16 PM Jan 04, 2024 IST | DHANANJAY SHETAKE
आपल्या दुसऱ्या लग्नासाठी पहिल्या पत्नीला धमकी देणारा पती अटकेत
Advertisement

आपल्या पहिल्या पत्नीसोबत घालवलेल्या खासगी क्षणाचे व्हिडीओ चित्रीकरण करून, घटस्फोट न दिल्यास ते व्हीडिओ वायरल करू अशी धमकी देणाऱ्या पतीला अखेर पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisement

या बाबत समजलेली माहिती अशी की, बेळगावात राहणारा पती (किरण पाटील ) हा दुसऱ्या मुलीशी लग्न करण्यासाठी तयारीत होता. आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्याकरिता वारंवार तो तिला सतावतही असे, तसेच आपल्या पत्नीसोबत घालवलेल्या त्या खासगी क्षणाचा त्याने चोरून व्हिडीओ तयार करून तो व्हीडिओ वायरल करेन अशी धमकी देणाऱ्या पतीला अखेर बेळगाव पोलिसांनी अटक करून त्यास हिंडलगा कारागृहात धाडण्यात आले आहे. वारंवार किरण हा घटस्फोटासाठी आपल्या पत्नीवर दबाव टाकत असे. त्यामुळे संतप्त पहिल्या पत्नीने जिल्हा सायबर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली होती. सायबर पोलिसांनी त्याला पोलीस स्थानकात बोलावून घेऊन त्याची चोकशी केली. आपल्याला आता अटक होणार या भीतीने किरण पोलिसांच्या तावडीतून निसटला होता, त्याने नंतर आत्महत्येचा प्रयत्नही केला, मात्र वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन बेळगाव जिल्हा इस्पितळात दाखल केले. त्याच्यावर उपचार करून त्याची प्रकृती सुधारत आहे. सद्या त्याला हिंडलगा कारागृहात रवाना करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#belgaum#crime#husband#police#wife
Next Article