महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मायलेकीच्या मृत्यूप्रकरणी पती अनुरागसिंगला अटक

06:24 AM Jan 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पती व सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद ,पोलिसांचा घातपाताचाच निष्कर्ष

Advertisement

प्रतिनिधी/ वास्को

Advertisement

वास्कोतील मायलेकीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी अखेर अनुरागसिंग राजावत याच्याविऊद्ध वास्को पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंद कऊन त्याला अटक केली आहे. या दोघींच्या मृत्यू प्रकरणात सासू साधनासिंग राजावत हिचाही सहभाग असल्याचा आरोप वास्को पोलिसांनी ठेवलेला असून तिच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. मागच्या महिन्यात पोलिसांनी मायलेकीचे मृत्यूप्रकरण हुंडाबळी म्हणून नोंद केले होते व अनुरागसिंगलाच त्या मृत्यूबाबत जबाबदार ठरवले होते. दरम्यान, अनुरागसिंगला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांच्या पोलीस कोठडीचा रिमांड दिला आहे.

18 नोव्हेंबर 2023 च्या सकाळी नऊच्या सुमारास नवेवाडे वास्कोतील एका इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आगीचा भडका उडाला होता. या आगीत शिवानी राजावत (वय 26) ही गर्भवती महिला व तिची आई जयदेवी चौहान  यांचा होरपळून मृत्यू झाला होता. आपली मुलगी गरोदर असल्याने तिला मदत करण्यासाठी मुलीकडे आलेल्या जयदेवी हिचा या घटनेत नाहक बळी गेला होता. स्वयंपाक गॅस सिलिंडरमधून गळती होऊन स्वयंपाक खोलीत गॅस साठून राहिला व त्या साठलेल्या गॅसचा भडका होऊन  मायलेक होरपळल्याचे प्राथमिक अनुमान घटना घडल्यानंतर काढण्यात आले होते. मात्र, हळूहळू या प्रकरणाने वेगळे वळण घेतले होते. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मयत शिवानीचा मध्यप्रदेशमध्ये पोलीस खात्यात असलेल्या शुभम चौहान या भावाने आपला भावोजी अनुरागसिंग राजावत याच्याविऊद्ध आपली बहीण व आईच्या मृत्यू प्रकरणी संशय व्यक्त केला होता. अनुरागसिंग व त्याची आई आपल्या बहिणीचा हुंड्यासाठी सतत छळ करीत होत्या. त्या छळवणुकीतूनच आपल्या आई व बहिणीवर मृत्यू ओढवलेला आहे, असा आरोप त्याने केला होता. तर मयत शिवानीच्या वडिलांनी या दुहेरी मृत्यूचा तपास सीबीआयमार्फत व्हावा, अशी मागणी केली होती. मात्र, मागच्या पावणे दोन महिन्यांत या प्रकरणाच्या तपासात शिवानीचे पती अनुरागसिंग याच्याविऊद्ध ठोस पुराव्याअभावी खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता.

पती अनुरागसिंगसह सासू साधनासिंग हिच्याविरुद्धही खुनाचा गुन्हा नोंद

मागच्या महिन्याच्या अखेरीस वास्को पोलिसांनी सदर प्रकरण हे हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे नोंद करून या दोन्ही मृत्यूना शिवानीचे पती अनुरागसिंग राजावत यालाच जबाबदार धरले होते व त्याच्याविऊद्ध भारतीय दंड संहितेचा कलम 304 बी नुसार गुन्हा नोंद केला होता. मयत शिवानीचा विवाहाच्या केवळ दीड वर्षांतच संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याने तिच्या मृत्यूचा तपास मुरगाव उपजिल्हाधिकाऱ्यांनी केला होता. तपासाअंती उपजिल्हाधिकाऱ्यांनी वास्को पोलिसांना अहवाल सादर करून या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची सूचना केली होती. त्यानुसार पोलिसांनी हे प्रकरण हुंडाबळी म्हणून नोंद करून पुढील तपास चालवला होता. शुक्रवारी रात्री पोलिसांनी अनुरागसिंग राजावत याच्या विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा नोंद केला. दोन्ही मृत्यूंचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे. तसेच अनुरागसिंगची आई साधनासिंग हिचाही हुंड्यासाठी झालेल्या छळवणुकीत सहभाग असल्याने तिच्याविरुद्धही या खुनात सहभाग असल्याचा आरोप ठेवून गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.

अनुरागसिंग राजावतने खून कसे केले, नियोजन गुलदस्त्यात

शिवानी राजावत व जयदेवी चौहान यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर हा आत्मघाताचा प्रकार की घातपाताचा प्रकार की अपघाताचा प्रकार असा प्रश्न निर्माण झाला होता. ज्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली. त्या फ्लॅटमध्ये अनेक गोष्टी संशयास्पद वाटत होत्या. एवढा भडका उडूनही स्वयंपाक खोलीत सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. सिलिंडरमधून गॅस गळती झाली, की घडवली गेली, भडका कसा उडाला असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते. घटना घडली तेव्हा अनुरागसिंग इमारतीच्या पायऱ्यांवरच होता. भडक्याचा आवाज होताच इतरांपुढे तोही धावत गेला. बऱ्याच गोष्टीबाबत संशय पसरला होता. मात्र, मुरगावचे उपजिल्हाधिकारी तसेच वास्को पोलीसही महिन्याभरानंतरही ठोस निष्कर्षापर्यंत आले नव्हते. जयदेवीच्या मृत्यूचा स्वतंत्र तपास पोलिसांनी केला. मात्र, तेही ठोस निष्कर्षाप्रत आले नव्हते. अखेर शिवानीच्या मृत्यूचा तपास करता करता पोलीस हुंडाबळीचे प्रकरण खूनच असल्याच्या निष्कर्षापर्यंत आले आहेत. मात्र, अनुरागसिंगने हे खून कसे केले, त्याने कशा प्रकारे नियोजन करून हे दुहेरी खून घडवून आणले याचा उलगडा पोलिसांनी केलेला नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article