कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नवविवाहितेचा खून करून पती फरार

01:09 PM Oct 09, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कमलदिन्नीतील घटना : मृतदेह बेड बॉक्समध्ये

Advertisement

बेळगाव : केवळ साडेचार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या एका नवविवाहितेचा खून करून तिचा मृतदेह कॉटखालील बेड बॉक्समध्ये ठेवून पती फरारी झाला आहे. मुडलगी तालुक्यातील कमलदिन्नी येथे बुधवारी ही घटना उघडकीस आली असून रात्री उशिरापर्यंत मुडलगी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. साक्षी आकाश कुंभार (वय 20) रा. कमलदिन्नी असे त्या दुर्दैवी नवविवाहितेचे नाव आहे. तीन दिवसांपूर्वी तिचा खून झाला असावा, असा संशय आहे. घटनेची माहिती समजताच गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नाईक, तहसीलदार श्रीशैल गुडमे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. केवळ साडेचार महिन्यांपूर्वी साक्षी व आकाश यांचे लग्न झाले होते. लग्नानंतर लगेच हुंड्यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा छळ सुरू झाला होता.

Advertisement

सोमवारी 6 ऑक्टोबर रोजी साक्षीची सासू आपल्या मुलीला भेटण्यासाठी परगावी गेली होती. बुधवारी ती गावाहून परतली. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. आतून दुर्गंधी सुटली होती. दरवाजा उघडल्यानंतर दुर्गंधी वाढली. घरात सर्वत्र पाहणी केली असता कॉटखाली अंथरून ठेवण्यासाठी असलेल्या बेड बॉक्समध्ये साक्षीचा मृतदेह आढळून आला. सोमवारपासून साक्षीचा पती आकाश हा फरारी आहे. त्याचा मोबाईलही बंद आहे. त्यामुळे सोमवारी ही घटना घडली असणार असा संशय आहे. खुनाच्या या घटनेत आकाशच्या कुटुंबीयांचा सहभाग आहे का? याची चौकशी करण्यात येत आहे. कारण या घटनेनंतर साक्षीचे सासरेही कोणाला दिसले नाहीत.  त्यामुळेच एकंदर प्रकरणाभोवती संशय बळावत चालला असून चौकशीअंतीच अधिक माहिती बाहेर पडणार आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर घटनास्थळी गावकऱ्यांनी गर्दी केली होती. साक्षीच्या माहेरवासियांचा आक्रोश सुरू होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article