For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

फ्रान्सला चक्रीवादळ तडाखा, 1000 ठार

06:58 AM Dec 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
फ्रान्सला चक्रीवादळ तडाखा  1000 ठार
Advertisement

मायोट क्षेत्रात हाहाकार, अणुहल्ल्यासारखी स्थिती

Advertisement

वृत्तसंस्था / पॅरिस

फ्रान्स देशाच्या मालकीच्या मायोट नामक सागरतटीय क्षेत्राला भीषण चक्रीवादळाचा तडाखा बसला असून त्यामुळे 1 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. हे क्षेत्र आग्नेय हिंदी महासागरात आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे या बेटावर अणुबाँबचा हल्ला झाल्यासारखी परिस्थिती उद्भवली असून फ्रान्सचे प्रशासन जीवितहानी नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगाने कार्यरत झाले आहे, अशी माहिती तेथील प्रशासनाकडून देण्यात आली.

Advertisement

या चक्रीवादळाला ‘चिडो’ असे नाव देण्यात आले आहे. या वादळाचा प्रारंभ चार दिवसांपूर्वीच झाला होता. ते फ्रान्सच्या सागरतटाला तेथील प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 वाजता आदळले. त्यामुळे या भागात अक्षरश: हाहाकार उडाला आहे. अनेकांनी ऐनवेळी आपल्या वाहनांनी दूरवरच्या सुरक्षित स्थळी पोहचण्यात यश मिळविल्याची माहिती देण्यात आली. फ्रान्समध्ये अशा प्रकारचे चक्रीवादळ गेल्या 90 वर्षांमध्ये प्रथमच आल्याचे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले.

तीव्रता थंडावली

सागरतटाला थडकल्यानंतर वादळाचा वेग सहा तासांमध्ये कमी झाला. तथापि, तेव्हढ्या काळात प्रचंड प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी झाली. किमान 1 हजार लोक मृत्युमुखी पडले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. मायोट क्षेत्रात पत्र्याच्या घरात राहणाऱ्यांची संख्या मोठी आहे. वादळामुळे त्यांची घरे वाऱ्याच्या तडाख्याने उडाल्याने त्यांच्यावर बेघर होण्याची वेळ आली आहे. फ्रान्ससारख्या पुढारलेल्या देशात अशा प्रकारे जीवितहानी व्हावी याचे जगाला आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिक व्यक्त करीत आहेत.

मोठ्या इमारतीही कोसळल्या

हे वादळ सागरतटापर्यंत पोहचले तेव्हा, वाऱ्याचा वेग ताशी 150 किलोमीटर होता. वादळाच्या तडाख्यासमोर या भागातल्या मोठ्या इमारतीही कोसळल्या आहेत. अनेक इमारती आणि आस्थापनांच्या ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले असण्याची शक्यता आहे. त्यांच्या जिवंत असण्याची शक्यता कमी आहे, असे तेथील प्रशासनाने स्पष्ट केले. सर्व मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटविण्यासाठी आणखी अनेक दिवस लागू शकतात, असे अनुमान व्यक्त केले जात आहे.

अन्न-पाण्याची टंचाई

वादळग्रस्त भागांमध्ये आता अन्न आणि पिण्याचे पाणी यांची टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अनेक लोकांना अन्न मिळालेले नाही. त्यामुळे महामारी पसरण्याचा धोकाही निर्माण झाला आहे. फ्रान्सच्या सरकारने रविवारी संध्याकाळी 11 जणांच्या मृत्यूची माहिती दिली होती. तथापि, वादळाचा जोर काही तासात प्रचंड वाढल्याने जीवितहानी मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.

मायोट भाग कोठे आहे?

मायोट हा फ्रान्सच्या मुख्य भूमीतील भाग नाही. हा भाग हिंदी महासागराच्या आग्नेय भागात असून हे एक बेट आहे. या बेटाचा शोध फ्रान्सच्या दर्यावर्दींनी तीनशे वर्षांपूर्वी लावला होता. येथे फ्रान्सची वसाहत असून बहुतेक स्थायिक लोक फ्रान्सचेच आहेत. काही प्रमाणात स्थानिक लोकही आहेत. हा प्रदेश युरोपियन महासंघातील सर्वात गरीब प्रदेश म्हणून ओळखला जातो. फ्रान्समधून स्थलांतरित करण्यात आलेल्यांची संख्या येथे मोठी आहे. हे लोक प्रामुख्याने टीनच्या पत्र्यांच्या घरात राहतात. मुख्य भूमीचा भाग नसल्याने येथे साहाय्यता आणि आपत्कालीन सेवा पुरविण्यासही बराच विलंब लागल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. आता या बेटाच्या आजूबाजूच्या देशांनी आता साहाय्याचा हात पुढे केला असून अन्न, औषधे आणि इतर जीवनावश्यक वस्तू पुरविण्यासाठी हे देश पुढे आले आहेत. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन स्थानिक प्रशासनाच्या सतत संपर्कात आहे.

मृतांची संख्या वाढण्याची चिंता

ड फ्रान्सच्या मालकीचे हे आग्नेय हिंदी महासागरातील एक लहान बेट

ड बेटाला चिडो वादळाचा तडाखा बसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत

Advertisement
Tags :

.