महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सांगलीत रेल्वेखाली येण्यापासून शेकडो वाचले : एक्सप्रेसजवळ आली तरी गेटवरून वाहनांची ये जा सुरूच !

10:05 AM Jun 12, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

जुना बुधगाव रेल्वेगेटवरील धक्कादायक प्रकार : रिक्षा आणि टेंम्पोचालकांची घुसघोरी : रेल्वे कर्मचाऱ्याची सतकर्ता

सांगली प्रतिनिधी

सांगलीतील जुन्या बुधगाव रोडवरील पंचशीलनगर येथील गेटवर रेल्वे येत असतानाही वाहनांची ये जा सुरूच होती. मंगळवारी सकाळी साडेआकराच्या दरम्यान लोको पायलट आणि गेटवरील कर्मचारी यांच्या सतर्कतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली. संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या चालकांने प्रसगावधान राखून माधवनगर स्टेशनपासून गाडीचा वेग कमी केल्याने आणि गेटवरील कर्मचाऱ्याने दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना रोखून गेट बंद केल्याने दुर्घटना टळली. पंचशीलनगर रेल्वेगेटवरून काहीदिवसामध्ये रिक्षा आणि टेंम्पोचालकांच्या घुसघोरीमुळे येथे वाहतुकीची कोंडी होत असून येथे लोकांचा जीव टांगणीला लागला आहे. याबाबत वाहनचालक आणि नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

पुणे मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी वर्षभरापुर्वी चिंतामणीनगर येथील उड्डाणपुल पाडून येथील वाहतूक संजयनगर, कर्नाळ रोड आणि जुना बुधगाव रोड अशा तीन पर्यायी मार्गाने वळविली आहे. यातील एसटी आणि इतर सर्व अवजड वाहने संजयनगरमार्गे येजा करतात. यातील मालवाहू गाडया आणि अन्य छोटी वाहने जुन्या बुधगाव रोडने येऊ लागल्याने पंचशीलनगर गेटवर वाहतुकीची मोठी कोंडी होऊ लागल्यामुळे रेल्वे व जिल्हा पोलीस यंत्रणेच्यावतीने गेटजवळ बॅरेकेट लावली. त्यामुळे येथून ये जा करणाऱ्या शेकडो दुचाकीस्वारांना काहीसा दिलासा मिळाला.

Advertisement

पण मागील काही दिवसापासून जुन्या बुधगाव रोडवरील गेटवरून रिक्षा आणि अन्य छोटी वाहने ये जा करू लागल्याने मोठया प्रमाणात वाहतुकीची कोंडी होवू लागली आहे. मंगळवारी सकाळीही सांगलीकडून मुंबईकडे कोयना एक्सप्रेस गेल्यानंतर गेटवर वाहनांची गर्दी होती. ही गाडी गेल्यानंतर पुण्याकडून कोल्हापूरच्या दिशेने सकाळी साडेअकराच्या दरम्यान संपर्क क्रांती एक्सप्रेस येत होती. या गाडीने माधवनगर स्टेशन पास केले तरी पंचशीलनगरच्या गेटवरून वाहनांची ये जा सुरूच होती. त्यामुळे गाडीच्या चालकाने जोरजोरात हॉर्न वाजविण्यास सुरूवात केली. गेटवरील कर्मचाऱ्यानेही शिट्टी आणि सायरन वाजवित गेट खाली आणण्याचा प्रयत्न केला. तरीही लोक ऐकनासे झाल्यावर गेटवरील कर्मचाऱ्यांला घाम फुटण्याची वेळ आली. अखेर संपर्क क्रांती एक्सप्रेसच्या चालकांनेच गाडीचा वेग कमालीचा कमी केला. तोपर्यंत इकडे रेल्वेच्या कर्मचाऱ्यानेही प्रसंगावधान राखून गडबडीने दोन्ही बाजूच्या वाहनचालकांना रोखून गेट खाली आणले आणि आणि संपर्क क्रांती एक्सप्रेस हळूपणे सांगलीच्या दिशेने मार्गस्थ झाली.

काही वाहनचालक इतर वाहनचालकांना गाडया मागे घ्या असे सांगत असतानाही लोक ऐकायला तयार नव्हते. रिक्षाचालकांकडून गाडया मध्येच घुसविण्याचे प्रकार सुरूच होते. दोन्ही बाजूला रिक्षाचालकांनी केलेल्या घुसघोरीमुळे होता होता एक मोठी दुर्घटना टळली. यामुळे अनेकांचे बळी गेले असते. काही क्षणात घडलेल्या या घडनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका मात्र चुकला. जुन्या बुधगाव रोडवर मनमानी आणि घुसघोरी करणाऱ्या रिक्षाचालकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील वाहनचालक आणि नागरिकांतून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :
Sangli expressSangli Railway
Next Article