For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेकडो लोक ‘ऑनलाईन’ फसले

01:16 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
शेकडो लोक ‘ऑनलाईन’ फसले
Advertisement

राज्यात ‘आयसीसीआयबीआयएस’च्या अॅपद्वारे नागरिकांना गंडा, उद्योजक, किराणा, फळ व्यावसायिक,वकिलांचीही झाली फसवणूक

Advertisement

पणजी : सायबर क्राईम या विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांमार्फत वारंवार जागृती करूनही याकडे विशेषत: लक्ष दिले जात नसल्यानेच  ऑनलाईन पद्धतीने फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. आता नव्याने राज्यात व्हॉटस्अॅपद्वारे एक अॅप बनवून  त्याद्वारे राज्यातील शेकडो लोकांकडून लाखो ऊपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. ऑनलाईन पद्धतीने झालेल्या फसवणुकीत शेकडो लोक फसले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेले लोक आता सायबर क्राईम विभागाकडे तक्रार नोंदविण्याच्या तयारीत आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरवातीला एसीसीआयबीआयएस (Aम्म्ग्ंग्s) या नावाचे अॅप अस्तित्वात आले. व्हॉटसअपद्वारे सुरू केलेल्या या ऑनलाईन व्यवहारात गोव्यातील शेकडो लोक गुंतत गेले. देशातील एका नामांकित हॉटेलचा लोगो वापरून हॉटेलमध्ये ऊम देऊन त्यावर सवलत व अतिरिक्त रक्कम देण्याचे आमिष दाखवून लोकांना यामध्ये ओढून घेण्यात आले.

व्हॉटसअपवर ग्रुप अॅडमिन म्हणून ऊक्सार मुन्ना शेख या महिलेवर ग्राहक नोंदणीची जबाबदारी देण्यात आल्याचेही समोर आले आहे. या महिलेने ‘एसीसीआयबीआयएस’ व्हॉटसअपवर सुरुवातीला 1500 ऊपये भरून ग्राहक नोंदणी केली. त्यानंतर करताना लाखो ऊपये ऑनलाईन पद्धतीने घेतले. सुरुवातीला काही लोकांना काही रक्कम आपल्या बँक खात्यात जमा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी लाखांहून अधिक ऊपयांची गुंतवणूक सुरू केली. काही दिवसानंतर हे अॅप बंद पडल्यानंतर लोकांच्या मनात धाकधूक वाढली. या प्रकारानंतर नवेवाडे-वास्को, पणजी, म्हापसा, पर्वरी, मडगाव आदी भागातील लोकांनी विचारणा केली असता अॅडमिन असणाऱ्या ऊक्सार शेख या महिलेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत. लाखो ऊपयांना फसलेल्या राज्यातील अनेक नागरिकांनी आता सायबर क्राईम या विभागाकडे तक्रारी देण्याची तयारी चालवली आहे. ‘एसीसीआयबीआयएस’ (Aम्म्ग्ंग्s) या नावाने सुरू करण्यात आलेले अॅप सध्या बंद पडले असून, लोकांनी ह्या अॅपद्वारे आपलेला दिलेला ग्राहक नोंदणी क्रमांक टाकूनही त्याचा काहीच उपयोग होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे लाखो ऊपये आमचे बुडाल्याची भावना लोकांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

फसगतीचे मूळ कारण हाव

सायबर क्राईम विभागामार्फत लोकांची फसवणूक होऊ नये, यासाठी अनेक प्रकारे सुरक्षेबाबत जागृती केली जाते. तरीही लोकांच्यामध्ये वाढत चालेली शॉटकर्ट मार्गाने पैसे कमविण्याची लागलेली हाव हेच फसगतीचे मूळ कारण आहे. सायबर क्राईम विभागामार्फत जागृतीबाबत अनेक उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. पॉम्प्लेट (पत्रिका) वाटल्या जातात. फेसबूक, इन्स्टाग्राम या माध्यमाद्वारेही सोशल मीडियावर जागृती केली जाते. तरीही लोक याकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच त्यांची ऑनलाईन पद्धतीने फसवणूक होत चाललेली आहे. लोकांमध्ये निर्माण झालेली पैशांची हाव हे मुख्य कारण आहे. त्यामुळे लोकांनी ऑनलाईन पद्धतीने कोणतेही पैशांशी संबंधित व्यवहार करताना किमान त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणे गरजेचे आहे.

- विद्यानंद पवार (पोलीस निरीक्षक - सायबर क्राईम)

सर्वाधिक वास्कोतील लोकांचा समावेश

ऑनलाईन पद्धतीने फसवणूक झालेल्या लोकांमध्ये वास्कोचा समावेश आहे. कारण नवेवाडे-वास्को येथील बहुतांश लोकांनी लाखो ऊपयांची गुंतवणूक केलेली आहे. यामध्ये एक ऊपयाही त्यांना फायदा झालेला नाही. काही लोकांनी तर कर्ज काढून या ऑनलाईन हॉटेल बुकींग व्यवसायात पैसे गुंतवलेले आहेत. उद्योजक लोकांनी तर लाखो ऊपयांचे अनेकदा नोंदणी केलेली आहे. किराणा दुकानदार, फळ विक्रेता तसेच व्यवसायाने वकील असलेले लोकही यामध्ये फसलेले आहेत.

Advertisement
Tags :

.