For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सोलारचे शंभर कंदील लोककल्पतर्फे वितरित

10:40 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
सोलारचे शंभर कंदील लोककल्पतर्फे वितरित
Advertisement

बेळगाव : लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी संचालित लोककल्प फाऊंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील दत्तक घेतलेल्या काही गावांमध्ये सोलारचे शंभर कंदील देण्यात आले. कणकुंबी, गव्हाळी, ओतोळी, आंबोळी, हुळंद, हंदिकोप्पवाडा, घोसे, कापोली, चिगुळे, माण, चोर्ला, तळावडे, कालमणी, आमटे, बेटणे व पारवाड या गावांना हे कंदील देण्यात आले. सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या पुढाकाराने लोककल्पमध्ये अनेक उपक्रम घेण्यात येतात. सामाजिक बांधिलकी म्हणून दत्तक खेड्यांमध्ये त्या त्या गावच्या गरजा ओळखून साहाय्य केले जाते. याचाच एक भाग म्हणून हे कंदील देण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.