महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हरिभक्तांची नम्रता

06:02 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भगवंतांना जाणण्यासाठी हरिभक्तांचा सर्वात महत्त्वाचा गुण म्हणजे स्वाभाविक नम्रता. भगवान श्रीकृष्णांना जाणणे म्हणजे रहस्य उलगडण्यासारखे आहे, पण हरिभक्तांना ते रहस्य सहजपणे उलगडते. याचे कारण आहे हरिभक्त नम्रतेने भगवंत जे काही भगवद्गीतेमध्ये सांगतात ते स्वीकारतात. म्हणून भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात की मी केवळ भक्तीनेच जाणला जाऊ शकतो, इतर कोणत्याही मार्गाने नाही. (भ गी 11.53)नाहं वेदैर्न तपसा न दानेन न चेज्यया । शक्मय एवंविधो द्रष्टुं दृष्टवानसि मां यथा ।। अर्थात ‘तुझ्या दिव्य चक्षुंद्वारे तू जे रूप पहात आहेस ते केवळ वेदाध्ययनाने, कठोर तपाने, दानाने किंवा पूजेने जाणणे शक्मय नाही. या साधनांद्वारे कोणीही मला माझ्या मूळ स्वरूपामध्ये पाहू शकत नाही.’ (भ गी 11. 54)भक्त्या त्वनन्यया शक्मय अहमेवंविधोऽर्जुन । ज्ञातुं द्रष्टं च तत्त्वेन प्रवेष्टंg च परन्तप : अर्थात ‘हे अर्जुन! मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्तियोगानेच जाणणे शक्मय आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्त्वात प्रवेश करू शकतोस.’

Advertisement

हरिभक्त नम्रतेने स्वीकारतो की तो अज्ञानी आहे, भगवंतांना समजण्यास अपात्र आहे आणि केवळ भगवंतांनी कृपा केली तरच त्यांना समजू शकेल. अशा हरिभक्तांच्या हृदयामध्ये असलेल्या नम्र भावनेने प्रसन्न होऊनच भगवंत आपल्या स्वरूपाचे रहस्य प्रकट करतात. उदाहरणादाखल कांही भक्तांच्या नम्र प्रार्थना आपण पाहू.

Advertisement

प्रल्हाद महाराज यांच्या डोक्मयावर नृसिंहदेव आशीर्वाद देण्यासाठी हात ठेवतात तेव्हा नम्रतेने प्रल्हाद महाराज म्हणतात (भा. 7.9.26) क्वाहं रज:प्रभव ईश तमोऽधिकेऽस्मिन् जात: सुरेतरकुले क्व तवानुकम्पा । न ब्रह्मणो न तु भवस्य न वै रमाया यन्मेऽर्पित: शिरसि पद्मकर: प्रसाद: : अर्थात ‘हे प्रभो ! रज आणि तम या नारकी गुणांच्या अधीन असणाऱ्या असुर कुळातच माझा जन्म झालेला असल्याने माझ्याविषयी काय सांगावे आणि ब्रह्मदेव, शिव किंवा लक्ष्मी यांनाही पूर्वी कधीही देण्यात न आलेल्या तुमच्या अहैतुकी कृपेविषयी काय सांगावे? तुम्ही आपला कमळासमान हात त्यांच्या मस्तकावर कधीच ठेवलेला नाही, पण माझ्या मस्तकावर मात्र तोच कोमल हात ठेवलेला आहे.”

भगवान वामनदेव यांना उद्देशून नम्रतेने बळी महाराज म्हणतात (भा   5.24.26) तस्यमहानुभावस्यानुपथममृजितकषाय: को वास्मद्विध: परिहीणभगवदनुग्रह उपजिगमिषतीति : अर्थात ‘ऐहिक सुखोपभोगांवर अत्यंत आसक्त असलेले, त्रिगुणांच्या प्रभावाने प्रदूषित झालेले आणि भगवंतांची कृपा प्राप्त झालेले आम्हासारखे पुऊष भक्तशिरोमणी प्रल्हाद महाराजांनी दाखविलेल्या सर्वश्रेष्ठ मार्गाचे अनुसरण करू शकत नाहीत.”

कंस गोकुळात जाऊ शकत नाही म्हणून श्रीकृष्ण आणि श्रीबलराम यांना मथुरेमध्ये आणून ठार मारण्याच्या दुष्ट हेतूने अक्रूराला गोकुळ वृन्दावनात पाठवले. अक्रूर ज्यावेळी गोकुळ वृन्दावनाच्या सीमेवर येतो त्यावेळी त्याच्या मनात काय विचार चालले होते त्याचे वर्णन भागवतमध्ये येते. अक्रूर नम्रतेने म्हणतो (भा 10. 38. 3) किं मयाचरितं भद्रं किं तप्तं परमं तप: ।किं वाथाप्यर्हते दत्तं यद्द्रक्ष्याम्यद्य केशवम् : अर्थात ‘मी असे कोणते पुण्य, कोणते खडतर तप, कोणती श्रेष्ठ उपासना वा कोणते सत्पात्री दान दिलेले आहे की ज्यामुळे आज मला साक्षात भगवान केशवांचेच दर्शन घडणार आहे? (भा.10.38.4) ममैतद् दुर्लभं मन्य उत्तम:श्लोकदर्शनम् । विषयात्मनो यथा ब्रह्मकीर्तनं शूद्रजन्मन: अर्थात ‘इंद्रियतृप्तीमध्ये रमलेला असा मी घोर विषयी मनुष्य आहे. ज्याप्रमाणे अपात्र व्यक्तीला वेदाध्ययन दुर्लभ असते, त्याप्रमाणे भगवान उत्तमश्लोकांचे दर्शन घेण्याचे मला लाभलेले हे भाग्यही अतिशय दुर्लभ आहे, असे मी मानतो. (भा 10.38.5) मैवं ममाधमस्यापि स्यादेवाच्युतदर्शनम् । ह्रियमाण: कालनद्या क्वचित्तरति कश्चन,  अर्थात ‘मात्र मी असेही म्हणू नये. मी अधम असलो तरीही मला भगवान अच्युतदेवांचे निश्चितच दर्शन होणार, कारण काळरूपी नदीमध्ये वाहून गेलेला बद्ध जीवही क्वचित प्रसंगी तटावर पोहोचतोच.’ येथे आपली अपात्रता नम्रपणे व्यक्त करत असताना श्रीकृष्णाची अहैतुकी कृपा यावरही अक्रूर विश्वास व्यक्त करीत आहे.

भगवान श्रीकृष्णाचा बालपणीचा मित्र सुदामा जेव्हा द्वारकेमध्ये येऊन आता द्वारकेचे राजा असलेल्या श्रीकृष्णाची भेट घेतो, त्याबद्दल आनंद व्यक्त करताना सुदाम ब्राह्मण नम्रपणे म्हणतो (भा 10.81.16) क्वाहं दरिद्र: पापीयान् क्व कृष्ण: श्रीनिकेतन: । ब्रह्मबन्धुरिति स्माहं बाहुभ्यां परिरम्भति: अर्थात ‘कोठे मी, अत्यंत पापी आणि दरिद्री असा ब्रह्मबंधू आणि कोठे कृष्ण? षडैश्वर्यपूर्ण असे पुऊषोत्तम भगवान. तरीही त्यांनी मला प्रेमपूर्वक आलिंगन दिले’

भगवद्गीतेमध्येही अर्जुनाने जेव्हा भगवान श्रीकृष्णाचे विराट स्वरूप पाहिले तेव्हा क्षमायाचना करताना अर्जुन म्हणतो (भ गी 11.41-42) सखेति मत्वा प्रसभं यदुक्तं हे कृष्ण हे यादव हे सखेति । अजानता महिमानं तवेदं मया प्रमादात्प्रणयेन वापि ।41।।यच्चावहासार्थमसत्कृतोऽसि विहारशय्यासनभोजनेषु। एकोऽथवाप्यच्युत तत्समक्षं तक्षामये त्वामहमप्रमेयम् ।।42 ।।अर्थात ‘मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र मानून, हे कृष्ण, हे यादव हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने किंवा प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल कृपया मला क्षमा करा. विश्र्रांतीच्या वेळी, चेष्टा करताना, एकाच शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना आणि कधी कधी एकांतवासात तर कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत! माझ्या त्या सर्व अपराधांची क्षमा करा.’

संत तुकाराम महाराजही आपल्या अनेक अभंगातून भगवंतांसमोर अशी आपली दीनता नम्रपणे प्रकट करताना दिसतात. बुडतां आवरिं मज भवाचे सागरिं ।।1।।   नको मानू भार । पाहों दोषांचे डोंगर ।।ध्रु.।।आहे तें सांभाळीं । तुझी कैसी ब्रीदावळी।।2।।तुका म्हणे दोषी । मी तों पातकाची राशी ।।3।।अर्थात ‘भगवंता, मी या भव सागरामध्ये बुडत आहे तरी तू माझे रक्षण कर. माझे पर्वतप्राय दोष तू पाहू नकोस आणि माझा उद्धार करण्यासंबंधी भार पडतो असे मानू नकोस. पतितांना पावन करणे हे तुझे ब्रीदच आहे, ते तू पालन कर. तुकाराम महाराज म्हणतात मी मोठा दोषी आहे, पातकांची रासच आहे, माझा भवसागरातून उद्धार तुम्हीच करू शकता.’   सर्व दोषातून आणि पापातून मुक्त व्हावयाचे असेल तर श्रीकृष्ण चरणाचा आश्र्रय हा एकमेव उपाय आहे. श्रीकृष्ण विस्मरणानेच जीवाला जन्म-मृत्यूच्या चक्रात अडकून रहावे लागते आणि भवसागरात बुडावे लागते. याची जाणीव हरिभक्तांना असते म्हणूनच नम्रतेने भगवान श्रीकृष्णाकडे या अभंगात वर्णन केलेल्या शब्दातून प्रार्थना करतात.

आणखी एका अभंगात म्हणतात नाहीं साजत हो मोठा । मज अळंकार खोटा ।।1।।असें तुमचा रजरेण। संतां पायीं वाहाण ।।ध्रु.।।नाहीं स्वरूपीं ओळखी। भक्तीभाव करिं देखी ।।2।।नाहीं शून्याकारिं । क्षर ओळखी अक्षरिं ।।3।।नाहीं विवेक या ठायीं । आत्मा अनात्मा काई ।।4।।कांहीं नव्हें तुका । पाया पडणे हें ऐका ।।5।।अर्थात ‘हरिभक्तानो मला हा खोटा स्तुतीचा अलंकार शोभत नाही. माझी तशी योग्यता नाही. मी केवळ तुमच्या पायाचा एक धूलिकण आहे, संतांच्या पायातील वहाण आहे. मी श्रीकृष्णाचा सेवक आहे याचा मला अनुभव नाही, पण दुसऱ्यांचा भक्तिभाव पाहून मी त्यांची नक्कल करतो. मला श्रीकृष्णभक्तीचे शून्य ज्ञान आहे, क्षर-अक्षर कशाला म्हणतात तेही कळत नाही. आत्मा-अनात्मा याचे विवेकज्ञानही मला नाही. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या ठिकाणी हरिभक्तीचा कोणताही अधिकार नाही, पण एक ऐका, तुमच्या चरणांचा आश्र्रय घ्यावा एवढे कळते.

या अभंगात तुकाराम महाराज आपली नम्र भावना प्रकट करीत आहेत आणि इतरांना हरिभक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी कशी मानसिक भावना असावी याचे मार्गदर्शन करीत आहेत. हरिभक्तीमध्ये जर आपल्याला प्रामाणिकपणे प्रगती करावयाची असेल आणि श्रीकृष्णांची अहैतुकी कृपा प्राप्त करावयाची असेल तर त्यांना शरण गेलेल्या म्हणजे हरिभक्ती परायण अशा संतांच्या चरणाचा आश्र्रय घेणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांच्या भक्तीच्या प्रभावाने आपल्या हृदयातही हरिभक्तीची भावना जागृत होऊ शकते. श्रीमद भागवतमध्ये सांगितले आहे (भा 1.2.16)

शुश्रूषो: श्र्रद्दधानस्य वासुदेवकथाऊचि: । स्यान्महत्सेवया विप्रा: पुण्यतीर्थनिषेवणात् । अर्थात ‘हे द्विजश्रेष्ठानो, दोषमुक्त झालेल्या भगवद्भक्तांची श्र्रद्धेने, काळजीपूर्वक सेवा केल्यानेच दिव्य सेवा संपन्न होत असते. अशा सेवेनेच भगवान वासुदेवांच्या लीलाकथांच्या श्र्रवणात ऊची निर्माण होते.’ भगवंतांच्या सेवकांची प्रामाणिकपणे सेवा केल्याने मनुष्याला त्यांच्या कृपेने अशा शुद्ध हरिभक्तांचे गुण प्राप्त होतात.

            -वृंदावनदास

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article