माणसांना मिळाला परग्रहवासीयांचा ग्रह
भारतीय वैज्ञानिकाला आढळला चकित करणारा पुरावा
परग्रहवासीयांविषयी अध्ययन करणाऱ्या वैज्ञानिकांना मोठे यश मिळाले आहे. ब्रिटनच्या वैज्ञानिकांना दूर अंतराळात असलेल्या एका ग्रहावर परग्रहवासीय असल्याचे संकेत मिळाले आहेत. कॅम्ब्रिज विद्यापीठाच्या खगोलतज्ञांनी के2-18बी नावाच्या या ग्रहावर जीवनाशी संबंधित हालचालींचा आतापर्यंतचा सर्वात चांगला संकेत पाहिल्याचा दावा केला आहे. वैज्ञानिक याविषयी 99.7 टक्के आश्वस्त आहेत. के2-18बी नावाचा एलियन्स ग्रह 120 प्रकाशवर्षे दूर असून तो पृथ्वीच्या आकाराच्या जवळपास अडीच पट मोठा असल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले आहे.
पृथ्वीप्रमाणे मिळाले संकेत
खगोलतज्ञांनी ग्रहाच्या वायुमंडळात डीएमएस नावाच्या अणुची ओळख पटविली आहे. पृथ्वीवर या अणुची निर्मिती समुद्रात राहणारे छोटे शेवाळ करतात. त्यांना मानवी डोळ्यांना पाहिले जाऊ शकत नाही, परंतु मोठ्या संख्येत पाण्यावर रंगीत पट्ट्याप्रमाणे दिसून येतात. अशाचप्रकारे एलियन जीवन याला के2-18बी वर निर्माण करू शकते. आम्ही जे पाहत आहोत तसे जीवनाशिवाय शक्य नाही असे उद्गार प्रमुख वैज्ञानिक प्राध्यापक निक्कू मधुसूदन यांनी काढले आहेत.
जेम्स वेब टेलिस्कोपच्या डाटाचे अध्ययन
खगोलशास्त्रज्ञांनी अध्ययनासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपद्वारे मिळालेल्या डाटाचा वापर केला. या विशाल टेलिस्कोपला 2021 मध्ये लाँच करण्यात आले होते. अध्ययनादरम्यान वैज्ञानिकांना ग्रहाच्या वायुमंडळात दोन अणुंचे फिंगरप्रिट दिसून आले असून डायमेथिल सल्फाइड (डीएमएस) आणि डायमेथिल डायसल्फाइड (डीएडीएस) अशी त्यांची नावे आहेत. हे दोन्ही अणू केवळ पृथ्वीवर जीवनाच्या माध्यमातून निर्मित होतात, जे सर्वसाधारणपणे सुक्ष्मजीव आहेत.
ग्रहावर महासागराची शक्यता
निष्कर्ष इतके ठोस आहेत की योगायोगाने हे घडले असण्याची शक्यता केवळ 0.3 टक्के आहे. हा एक पाण्याने भरलेला महासागर आणि एक घनदाट हायड्रोजनने युक्त वायुमंडळ असलेला ग्रह असण्याची शक्यता आहे. जर हे हायसीन जग असेल तर हा ग्रह महासागरांनी व्यापलेला असेल असे उद्गार प्राध्यापक मधुसूदन यांनी काढले. हायसीन शब्द हायड्रोजन आणि ओशनला एकत्र मिळविल्याने निर्माण झाला आहे. त्या महासागरांचे तापमान काय असेल हे आम्ही जाणत नाहीत, परंतु हा पृथ्वीपेक्षा काहीसा तप्त असेल अशी अपेक्षा असल्याचे प्राध्यापक मधुसूदन यांनी म्हटले आहे.