For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्राण्यांचे जैविक घड्याळ बिघडवतोय माणूस

06:44 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्राण्यांचे जैविक घड्याळ बिघडवतोय माणूस
Advertisement

माणूस केवळ स्वत:चे नव्हे तर प्राण्यांचे जैविक घड्याळ देखील बिघडवत आहे. एका जागतिक अध्ययनानुसार मानवी हालचाली ज्यात हवामान बदल देखील सामील आहे ते सस्तन प्राण्यांच्या जैविक घड्याळाला प्रभावित करत आहे. केवळ 39 टक्के सस्तन प्रजातीच आता पूर्वीच्या संशोधनांमध्ये पाहिले गेलेल्या त्यांच्या वर्तनानुसार वर्तन करत आहेत. ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठासह अनेक संशोधकांचे हे अध्ययन सायन्स अॅडव्हान्सेस जर्नलमध्ये प्रकाशित झाले आहे.

Advertisement

संशोधकांनुसार सर्व प्राण्यांमध्ये सर्कैडियन रिदम म्हणजेच जैविक घड्याळ असते. शरीराचे हे अंतर्गत घड्याळ 24 तासांदरम्यान त्याच्या दैनंदिन हालचालींना नियंत्रित करते. प्रत्येक प्रजातीसाठी काळासोबत हे एक सामान्य वर्तन ठरते, परंतु हवामान बदल या नैसर्गिक चक्राला बाधित करत असल्याने याचे अनपेक्षित परिणाम असू शकतात.

445 सस्तन प्रजातींचे विश्लेषण

Advertisement

हा बदल समजून घेण्यासाठी वैज्ञानिकांनी 445 सस्तन प्राण्यांच्या व्हिडिओ फुटेजचे विश्लेषण करत त्यांच्या 24 तासांच्या दैनंदिन हालचालींचे अध्ययन केले. यात 38 देशांच्या 20,080 ठिकाणी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांद्वारे प्राप्त फुटेज सामील होते. यानंतर या निष्कर्षांची तुलना जुन्या संशोधनांशी करण्यात आली. यात केवळ 39 टक्के प्रजातींचे वर्तनच पूर्वी करण्यात आलेल्या संशोधनांच्या निष्कर्षांची मिळतेजुळते असल्याचे आढळून आले आहे.

बदलानुसार स्वत:मध्ये बदल

सस्तन प्राण्यांची दिनचर्या स्थिर राहते का ते पर्यावरणीय बदलांनुसार याला समायोजित करतात हे देखील अध्ययनात पाहिले गेले आहे. बहुतांश प्रजाती अनुकूलनशील असल्याचे आणि ते स्वत:च्या दैनंदिन वर्तनाला परिस्थितीनुसार बदलू शकतात असे दिसून आले आहे. अनेक प्राणी बदलत्या पर्यावरणात जिवंत राहण्यासाठी स्वत:च्या संचालन पॅटर्नला समायोजित करत असल्याचे यातून कळले आहे.

उजेडाच्या कालावधीचा देखील परिणाम

संशोधकांनी 126 प्रजातींचे आणखी सखोल अध्ययन केले आणि भूगोल त्यांच्या वर्तनाला कशाप्रकारे प्रभावित करतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. भूमध्य  रेषेपासूनचे अंतर दिवसाच्या उजेडाचा कालावधी आणि मानवी हालचालींचा प्रभावी 74 टक्के प्रजातींच्या दैनंदिन वर्तनावर पडत असल्याचे त्यांना आढळून आले आहे.

Advertisement
Tags :

.