मानव हक्क आयोगाची ‘स्मार्ट सिटी’ला नोटीस
युवकाच्या अपघाती मृत्यूची घेतली स्वेच्छा दखल
पणजी : स्मार्ट सिटी विकास कामांतर्गत राजधानीत मळा भागात खोदलेल्या एका ख•dयामुळे एका युवकाचा बळी जाण्याच्या प्रकाराची आता गोवा मानव हक्क आयोगाने गंभीर दखल घेतली असून ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेन्ट कंपनी’ला नोटीस बजावली आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून राजधानीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास आणि मनस्ताप सहन करावे लागत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तर कहरच झाला. मळा भागात खोदलेल्या एका ख•dयात दुचाकीसह कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात युवकाचा बळी जाण्याचा प्रकार घडला. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे चाललेल्या गोंधळावर वर्तमानपत्रांनी सतत उजेड टाकला होता. नववर्षाला झालेल्या अपघातावरही अशाच प्रकारे सडेतोड वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याचीच स्वेच्छा दखल घेत आयोगाने नोटीस बजावली आहे. आयोगाने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांनाही प्रतिवादी बनविले आहे. नोटिसीनुसार स्मार्ट सिटी कंपनी आणि साबांखा या दोन्ही संस्थांनी दि. 15 जानेवारी सकाळी 10.30 पर्यंत आयोगाला अहवाल सादर करावा, असा आदेश आयोगाचे प्रभारी अध्यक्ष न्या. डेस्मंड डिकॉस्टा आणि सदस्य प्रमोद कामत यांनी दिला आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यावर पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी : नगरसेवक उदय मडकईकर यांची मागणी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सुरू झालेल्या भीषण अपघातांच्या सत्रातून अनेक निष्पापांचे बळी गेले असून स्मार्ट सिटीच्या ख•dयात पडून एका युवकाच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूस पूर्णपणे सरकार जबाबदार आहे, असा आरोप पणजीचे माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर यांनी केला आहे. या प्रकाराची सखोल चौकशी करून मृताच्या कुटुंबीयांना 1 कोटी ऊपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. स्मार्टसिटीच्या नावाखाली पणजीच्या करण्यात आलेल्या चाळणीत आतापर्यंत कित्येक ट्रक, टँकर्स व अन्य वाहने कोसळली आहेत. आता याच ख•dयात पडून माणसांचेही बळी जाऊ लागले असून आधी रायबंदर भागात एकाचा बळी गेला होता तर सोमवारी मळा भागात केवळ 24 वर्षांच्या एका तऊणावर जीव गमावण्याची वेळ आली आहे. हे प्रकार असेच सुऊ राहिल्यास भविष्यात आणखी कितीजणांचे प्राण जातील, याचा अंदाजही करता येत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया मडकईकर यांनी व्यक्त केली आहे. गत कित्येक दिवसांपासून खोदलेल्या सदर ख•dयांच्या ठिकाणी सुरक्षेच्या योग्य उपाययोजना करण्यात कंत्राटदार अपयशी ठरला आहे. भरीस या परिसरात विजेचीही व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्या वेळी संपूर्ण काळोख होता. अशावेळी तेथे उजेडाची व्यवस्था करणे तसेच रेडियम पट्टी लावणे ही कंत्राटदाराची जबाबदारी होती. परंतु त्याने तशा कोणत्याही सुरक्षा उपाययोजना केल्या नव्हत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सदर कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मडकईकर यांनी केली आहे.