For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रचित सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये हुमा

07:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
रचित सिंहसोबत रिलेशनशिपमध्ये हुमा
Advertisement

सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल हे विवाहबंधनात अडकले आहेत. 7 वर्षांपर्यंत परस्परांना डेट केल्यावर 23 जून रोजी दोघांनीही नोंदणी विवाह केला होता. यानंतर दोघांनी एक ग्रँड रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. यात त्यांच्या कुटुंबीयांसोबत मित्रदेखील सामील झाले. सोनाक्षीच्या या पार्टीत तिची मैत्रिण हुमा कुरैशी स्वत:चा प्रियकर रचित सिंहसोबत सामील झाली. रचित आणि हुमाचा या पार्टीतील फोटो आता व्हायरल होत आहे. रचित सिंह हा मुंबईतील एक प्रख्यात अॅक्टिंग कोच आणि एस्पायरिंग अॅक्टर आहे. विक्की कौशल, अनुष्का शर्मा यासारख्या अनेक कलाकारांसोबत त्याने काम केले आहे. रचित अलिकडेच रविना टंडन यांच्यासोबत कर्मा कॉलिंग या वेबसीरिजमध्ये दिसून आला होता. तसेच वेदांत या सीरिजमध्ये त्याने काम केले होते. हुमा कुरैशीचा भाऊ साकिब सलीमचा रचित हा मित्र आहे. रचितपूर्वी हुमा ही दिग्दर्शक आणि पटकथालेखक मुद्दसर अजीज यांना डेट केले होते. तीन वर्षांपर्यंत डेट केल्यावर दोघांचाही ऑक्टोबर 2022 मध्ये ब्रेकअप झाला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.