महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हुळंद गाव वीस दिवसांपासून अंधारात

11:07 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कणकुंबी-हुळंद दरम्यानच्या विद्युत खांबांवर झाडे उन्मळून पडल्याने समस्या : वीज सुरळीत करण्यात हेस्कॉमला अडथळा 

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

जांबोटी-कणकुंबी भागातील वीजपुरवठा दहा ते बारा दिवसांनी सुरळीत केल्यानंतर कणकुंबी भागातील हुळंद, माण, सडा, चोर्ला आदी गावातील वीजपुरवठा दोन-चार दिवसांत सुरळीत करण्यात येईल, असे हेस्कॉमने सांगितले होते. परंतु वीस दिवस झाले तरी अद्याप हुळंद व इतर गावे अंधारातच असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कणकुंबी भागात होणाऱ्या वीजपुरवठ्यात कोणतीही समस्या निर्माण झाल्यास किंवा एखादा तांत्रिक बिघाड झाल्यास जांबोटीहून कणकुंबी भागातील सर्व वीजपुरवठा खंडित केला जातो. परंतु आता कणकुंबी भागातील वीजपुरवठा सुरळीत होऊन आठ ते दहा दिवस झाले तरी हुळंद व इतर चार-पाच गावे मात्र अद्यापही अंधारात आहेत. कणकुंबी,हुळंद दरम्यान असलेल्या विद्युत खांबावर झाडे उन्मळून पडल्याने खांब मोडून पडले आहेत व विद्युतवाहिन्या तुटून पडल्या आहेत. त्यामुळे हुळंद गावची वीज सुरळीत करण्यासाठी हेस्कॉमला अडथळा निर्माण होत आहे. गेले आठ दिवस हेस्कॉमकडून वीजपुरवठा सुरळीत करण्याची ग्वाही दिली जाते आहे. मागील आठवड्यात सुरळीत झालेला विद्युत पुरवठा पुन्हा खंडित केला जात असल्याने नागरिकांना सतराशे साठ संकटांचा सामना करावा लागत आहे.

दिवे पेटविण्यासाठी रॉकेलही नाही

दिवे पेटवण्यासाठी रेशन दुकानातून रॉकेलही मिळत नाही आणि उजेडासाठी लाईटही नाही. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. गेल्या दीड ते दोन महिन्यापासून अनियमित विद्युत पुरवठ्यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत. हेस्कॉम खात्याने कणकुंबी भागातील चोर्ला, हुळंद आदी गावांतील अनियमित विद्युतपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी हुळंद गावच्या नागरिकांनी केली आहे.

केवळ अर्धा तास वीजपुरवठा

सायंकाळी पाच-सहा वाजल्यानंतर कर्मचारी देखील आपलं डोकं चालवून जांबोटीमधून पुढील सर्व गावांचा वीजपुरवठा बंद करतात. त्यामुळे कणकुंबी भागातील सर्व गावांतील नागरिकांना अंधारात रहावे लागते. असा प्रकार नेहमीच घडत आहे. केवळ दिवसातून पाच-दहा मिनिटे विद्युतपुरवठा केला जात आहे. गेल्या काही दिवसांपासून दिवसाच्या 24 तासांपैकी फक्त पंधरा मिनिटे ते अर्धा तास वीजपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांना अनियमित विजेची डोकेदुखी ठरली आहे.

विजेअभावी पिण्याच्या पाणी नसल्याने हाल

गावात विजेची समस्या नेहमीच असते. परंतु गेल्या 20-25 दिवसांपासून गावात वीज नाही. मुसळधार पावसाने विजेच्या खांबावर झाडे पडली आहेत. हेस्कॉम आणि वनविभागाने त्वरित कार्यवाही करून ही समस्या सोडवावी, गावात विजेअभावी पिण्याच्या पाण्याचे हाल होत असून इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. तसेच मुलांच्या अभ्यासाचे फार नुकसान होत आहे.

- राजेश गावडे  

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article