For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

एचयुएल वॉटर प्युरिफायर व्यवसाय विकणार

07:00 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
एचयुएल वॉटर प्युरिफायर व्यवसाय विकणार

नवी दिल्ली : हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड (एचयुएल)ही कंपनी आपला पाणी शुध्दीकरणाशी संबंधीत प्युअर इट वॉटर प्युरिफायरचा व्यवसारय विकणार असल्याची माहिती मिळते आहे. यासंदर्भात व्यवहारासाठी कंपनीची काही जणांशी बोलणी सुरु असल्याचे समजते. एचयुएलने मात्र याबाबतीत दुजोरा दिलेला नाही. गेल्या काही महिन्यांपासून एचयुएल कंपनी संभाव्य खरेदीदारांचा शोध घेत आहे, अशी माहिती समोर येत आहे. सहकारी कंपनी युनिलिव्हर पीएलसी वॉटर प्युरिफायर इक्वीपमेंट बनवणारी चीनमधील कंपनी क्वीनयुअनमधील आपली हिस्सेदारी विक्री करणार आहे. युनिलिव्हरने 2014 मध्ये सदरच्या कंपनीत हिस्सेदारी खरेदी केली होती. सदरचा विक्रीचा व्यवहार हा 300 दशलक्ष डॉलरचा होऊ शकतो, अशी माहिती दिली जात आहे. एचयुएल ही कंपनीने 2004 मध्ये वॉटर प्युरिफायरच्या क्षेत्रात पदार्पण केले असून युरेका फोर्ब्स व केंट यांना या क्षेत्रात टक्कर देत आहे. आरओ वॉटर प्युरिफायर प्रणाली कंपनीने 2011 मध्ये लाँच केली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.