महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भुयारातील बचावकार्यात मोठे यश

06:58 AM Nov 23, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

42 मीटरपर्यंत ड्रिलिंग पूर्ण, लवकरच 41 कर्मचारी घेणार मोकळा श्वास

Advertisement

वृत्तसंस्था/ उत्तरकाशी

Advertisement

उत्तरकाशीच्या सिलक्मयारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी दिलासादायक वृत्त आज-उद्या मिळू शकते. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी मदत आणि बचावकार्य तीव्र करण्यात आले आहे. ड्रिलिंगचे काम रात्री 9 वाजेच्या सुमारास अंतिम टप्प्यात आले होते. पुढील टप्प्याचे कामही सुरू असून गुरुवारी आनंददायी बातमी मिळण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे. त्याचदरम्यान अडकलेले कामगार बाहेर आल्यानंतर त्यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्यासाठी 41 ऊग्णवाहिकाही बोगद्याच्या बाहेर सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

उत्तराखंडमधील उत्तरकाशी येथील बोगद्यात गेल्या 11 दिवसांपासून अडकलेल्या 41 मजुरांच्या सुखरूप बाहेर पडण्यासाठी संपूर्ण देश प्रार्थना करत आहे. आता या मजुरांना बाहेर काढण्यात गुंतलेल्या बचाव पथकाचे प्रयत्न संपुष्टात येताना दिसत आहेत. आत अडकलेल्या कामगारांना वाचवण्याची मोहीम लवकरच पूर्ण होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. उत्तरकाशी येथील बोगद्यात 41 मजूर अडकून 11 दिवस उलटले आहेत. आतापर्यंत त्यांच्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य राबवले जात आहे.

ओएनजीसी, एसजेवीएन, आरवीएनएल, एनएचआईडीसीएल आणि टीएचडीसी या पाच सार्वजनिक क्षेत्रातील एजन्सी कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याच्या कामात गुंतल्या आहेत. दरम्यान, कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याबाबत लवकरच चांगली बातमी येऊ शकते, असे बुधवारी बचाव पथकातील एका अधिकाऱ्याने सांगितले. कामगारांना वाचवण्यासाठी एनएसआयडीसीएलने सिलक्मयाराच्या बाजूला आणखी एक क्षैतिज बोअरिंगचे काम सुरू केले आहे. येथे आता व्हर्टिकल ड्रिलिंग केले जात आहे. तसेच बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी स्पष्ट संवाद साधता यावा यासाठी बचाव पथकाने वायर कनेक्टिव्हिटी असलेली संपर्क यंत्रणा विकसित केली आहे.

कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी विविध सरकारी एजन्सी तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येकाला एक विशिष्ट कार्य नियुक्त केले आहे. बचाव कार्यासाठी सल्ला देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ञ घटनास्थळी उपस्थित आहेत. बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांपैकी 15 कामगार झारखंडमधील गिरिडीह, रांची, पूर्व सिंहभूम, खुंटी आदी जिल्ह्यांमधील असल्याचे बुधवारी झारखंड सरकारचे संयुक्त कामगार आयुक्त राजेश प्रसाद यांनी सांगितले. उत्तरकाशीमध्ये झारखंड सरकारची टीम तयार आहे. बोगद्यातून बाहेर आल्यानंतर सर्व 15 मजुरांना देहराडूनहून रांचीला एअरलिफ्ट केले जाईल. डॉक्टरांच्या टीमने त्यांना वैद्यकीयदृष्ट्या तंदुऊस्त घोषित केल्यानंतर एअरलिफ्ट केले जाणार आहे.

अन्न-पाण्यासोबतच मनोबल वाढवण्याचा प्रयत्न

बोगद्याच्या सुरक्षित भागात वीज आणि पाणीपुरवठा सुरू आहे. शिजवलेले अन्न आणि औषधे पाईपलाईनद्वारे कामगारांपर्यंत पोहोचवली जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना दररोज गरम जेवण दिले जात आहे. कमी तेल आणि मसाले असलेले हे अन्न डॉक्टरांच्या देखरेखीखाली तयार केले जात आहे. मंगळवारी त्यांना चीज भाजी, भात आणि रोटी देण्यात आली. त्यानंतर बुधवारी जेवणासाठी खिचडी देण्यात आली. बचाव पथकासह कामगारांचा व्हिडिओ संवाद देखील होत असून बोगद्यात अडकलेल्या कामगारांचे मनोबल वाढवले जात आहे.

बचावकार्यात सातत्य

12 नोव्हेंबरला म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवशी सकाळी उत्तरकाशीमधील सिलक्मयारा बोगद्यात 41 मजूर आपल्या नेहमीच्या कामासाठी पोहोचले होते. बोगद्याचे काम बऱ्यापैकी पूर्ण होत आल्याने बोगद्यात वीज आणि पाण्याची व्यवस्था होती. डोक्मयावर हेल्मेट घालून प्रत्येकजण कामात मग्न होता आणि अचानक मोठा आवाज झाला. या आवाजासोबत मातीचा भला मोठा ढिगारा खाली आला आणि सगळे मजूर त्या ढिगाऱ्याच्या मागे अडकले. त्यांच्या बचावार्थ गेल्या गेल्या 11 दिवसांपासून वेगवेगळे प्रयत्न सुरू आहेत. मजूरांपर्यंत पोहोचण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

सर्व वैद्यकीय यंत्रणा सज्ज

रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बचाव पथकाचे कर्मचारी ऑक्सिजन मास्कसह बोगद्याच्या आत गेले. यावेळी बोगदा बचावकार्य अंतिम टप्प्यात आले असताना बचाव पथकाचे 21 सदस्य ऑक्सिजन मास्क घालून बोगद्यात पोहोचले. एनडीआरएफचे जवान सिलक्मयारा बोगद्यात दाखल झाले होते. तसेच बाहेर 30 ऊग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली होती. बोगद्यातून सुटका केल्यानंतर अडकलेल्या कामगारांची वैद्यकीय तपासणी आणि काळजी घेण्यासाठी चिन्यालीसौर येथील हॉस्पिटलमध्ये 41 खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात संपूर्ण वैद्यकीय व्यवस्था सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री धामी घटनास्थळी

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेला माहिती दिली आहे. याचदरम्यान बचावमोहीम अंतिम टप्प्यात आले असताना बुधवारी रात्री ते देहराडूनमधून उत्तरकाशी येथे दाखल झाले. यावेळी उत्तरकाशीतील सिलक्मयारा बोगद्यात बचावकार्य वेगाने सुरू होते.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews
Next Article