महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापुरात दुर्गादौडीला दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद

10:50 AM Oct 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : येथील शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानच्यावतीने नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीला दुसऱ्या दिवशीही मोठा प्रतिसाद मिळाला. या दौडीत धारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्यामध्ये युवा-युवतींचा सहभाग अधिक होता. दौडीची सुरुवात शिवस्मारक आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नगरसेवक नारायण ओगले व सुभाष देशपांडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यानंतर दौड शिवस्मारक, मिशनरी कंपाऊंड, श्री मारुती मंदिर (रेल्वेस्टेशन), मन्सापूर जुना रोड मन्सापूर, श्री रामलिंग मंदिर, असोगा येथील रामलिंग मंदिरात समाप्ती करण्यात आली. असोगा गावात दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले. संपूर्ण गाव भगवेमय करण्यात आले होते.

Advertisement

दौडीचा आजचा मार्ग

Advertisement

शिवस्मारक, न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनकर नगर, घोडे गल्ली, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री स्वामी समर्थ केंद्र, श्री दत्त मंदिर, अर्बन बँक, श्री दुर्गादेवी, श्री राम मंदिर, भट गल्ली, हरीबोल मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, विठ्ठल देव गल्ली, बेंद्रे खुट्ट, जुना बसस्टँड रोड, श्री बालाजी मंदिर, मारुती नगर, श्री मारुती मंदिर येथे समाप्ती होईल.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article