नंदगड येथील दुर्गामाता दौडला उदंड प्रतिसाद
11:11 AM Sep 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वार्ताहर/नंदगड
Advertisement
नंदगड येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येत असलेल्या दुर्गादौडीला गेले तीन दिवस मोठा प्रतिसाद मिळत आहे. अबाल, वृद्ध, युवतीसह युवकांचा मोठा सहभाग दौडीत दिसून येत आहे. महिलांकडून ठिकठिकाणी दौडीचे उत्साही स्वागत करण्यात येत आहे. दुर्गामाता दौडीची सोमवारपासून सुरुवात झाली आहे. रोज पहाटे 5 वाजता येथील लक्ष्मी मंदिराजवळ सर्वजण एकत्र जमतात. त्यानंतर गेले तीन दिवस लक्ष्मी देवीची पूजा करून दौडीला सुरुवात केली जात आहे. आतापर्यंत वरची गल्ली, बोंद्रे गल्ली, दुर्गानगर, सोनार गल्ली, गोलम गल्ली, गणपत गल्ली, जुन्या नंदगडमधील विविध गल्ल्यातून दौड काढण्यात आली. दौडीनिमित्त नंदगडमधील गल्लोगल्ली भगवेमय वातावरण दिसून येत आहे. भगव्या पताक्या व भगवे ध्वज घरावर लावण्यात आले आहेत.
Advertisement
Advertisement