खानापुरात दुर्गामाता दौडीच्या दुसऱ्या दिवशीही उदंड प्रतिसाद
दौड मार्गावर आकर्षक रांगोळ्या : पहाटेपासूनच फटाक्यांची जोरदार आतषबाजी
खानापूर : येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे नवरात्रीनिमित्त सुरू असलेल्या दुर्गामाता दौडीला दुसऱ्या दिवशीही धारकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये युवा-युवतींचा सहभाग अधिक होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन नगराध्यक्षा मिनाक्षी बैलूरकर, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, विनायक पाटील, संतोष देवलत्तकर, दिनेश गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. मंगळवार दि. 23 रोजी शिवस्मारक, बुरुड गल्ली, न्यू नाईक गल्ली, समादेवी गल्ली, शिवमंदिर, होसमणी गल्ली, केंचापूर गल्ली, श्री गणेश मंदिर येथे सांगता झाली. गावात दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले. होसमणी गल्लीत रेवणसिद्धय्या हिरेमठ, अरुण होसमणी यासह गल्लीतील नागरिकांनी दौडीचे भव्य स्वागत केले. दौडीच्या मार्गात रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. महिलानी ध्वजाला आरती करून पूजन करत होते पहाटेपासूनच फटाक्यांची आतषबाजी होत होती.
गुरुवारी दौडीचा मार्ग
गुरुवार दि. 25 रोजी शिवस्मारक, न्यू निंगापूर गल्ली, नागलिंगनकर नगर, घोडे गल्ली, श्री लक्ष्मी नारायण मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, दत्त मंदिर, अर्बन बँक, दुर्गादेवी, राम मंदिर, भट गल्ली, हरीबोल मंदिर, पंचमुखी महादेव मंदिर, म्हारताळ मांदिर, बालाजी मंदिर, लक्ष्मी गदगा, चौराशी गल्ली, चौराशी मंदिरात सांगता.