For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विमान, बस तिकीटात बेसुमार वाढ

12:23 PM Dec 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
विमान  बस तिकीटात बेसुमार वाढ
Advertisement

नाताळ, नववर्षासाठी येणाऱ्यांच्या खिशाला कात्री : परतीच्या प्रवासावरही होणार दामदुप्पट खर्च,काही मार्गांवर विमानापेक्षाही बसप्रवास महाग

Advertisement

पणजी : नाताळ सण आणि नववर्ष स्वागतासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ पुढील आठवड्यापासून सुरू होणार असून त्या पार्श्वभूमीवर विमान, बस यांच्या तिकीट दरात बेसुमार वाढ करण्यात आली आहे. पुढील दिवसात त्यात आणखीही वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तोच प्रकार नंतर नववर्ष साजरे करून परतणाऱ्या पर्यटकांनाही अनुभवावा लागणार असून 1 जानेवारीपासून पुढील आठवडाभर हे दर चढेच राहण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. यावर सरकारच्या संबंधित यंत्रणांनी लक्ष देणे आवश्यक आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून डिसेंबरचा शेवटचा आणि जानेवारीचा पहिला आठवडा या पंधरा दिवसात विमान, बस यांच्या तिकीट दरात अव्वाच्या सव्वा वाढ करून प्रवाशांची अक्षरश: लूट करण्यात येत असते. यावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. यावर्षीही तोच प्रकार राजरोस सुरु आहे. त्यामुळे सामान्य प्रवासी रडकुंडीला येत आहेत. चतुर्थी, दिवाळी यासारख्या सणासुदीच्या काळात अशाच प्रकारे तिकीटांचे दर बेसुमार वाढत असतात. तोच प्रकार नववर्षारंभीही अनुभवास येत असतो. या काळात सणासुदीच्या तारखा जवळ येतात तसतशा बस आणि विमान तिकिटांच्या किंमती वाढण्यास सुऊवात होत असते.प्रत्यक्षात मुंबई-गोवा मार्गावर वातानुकूलित बसचे भाडे साधारणपणे 1700 ऊपये असते. 22 डिसेंबरसाठी तेच भाडे 2800 ऊपयांपासून सुरू होत असून पुढे 4000 ऊपये पर्यंत जाण्याची शक्यता आहे. दि. 2 जानेवारी रोजी हेच भाडे साधारणत: 3000 ऊपयांपासून सुरू होत आहे.

अशाच प्रकारे मुंबई-गोवा विमान तिकीटाची किंमत साधारणपणे 3000 ऊपये एवढी असते. दि. 22-23 रोजी तीच किंमत 7118 ऊपये एवढी वाढविण्यात आली आहे. पुणे ते गोवा विमान तिकिटांची किंमत एरव्ही 4500 च्या आसपास असते. दि. 22 डिसेंबरसाठी त्याच तिकीटाचे दर 11410 ऊपये आहे. तर त्याच मार्गावर परतीच्या प्रवासासाठी दि. 2 जानेवारीला तिकीट दर 13612 ऊपये एवढे वाढविण्यात आले आहे. हैदराबाद-गोवा आणि बेंगळूर ते गोवा या मार्गांवर नियमित विमान तिकीट साधारणपणे 2,500 ऊपये एवढे आहे. पण 22 डिसेंबरपासून हैदराबाद-गोवा प्रवासासाठी एका तिकिटाची किंमत चौपट म्हणजेच सुमारे 8,942 ऊपये तर बेंगळूर ते गोवा प्रवासासाठी 5263 ऊपये एवढी असल्याचे स्पष्ट झाले आहे. वरील दोन्ही मार्गावर परतीच्या प्रवासासाठी दि. 2 जानेवारी रोजी 10,700 ते 12200 ऊपयांपेक्षा जास्त खर्च करावा लागणार आहे. दिल्ली-गोवा विमान तिकीट एरव्ही 5000 ऊपयांना उपलब्ध असते. दि. 22 रोजीसाठी त्यात दुप्पटीपेक्षा जास्त वाढ करण्यात आली असून ते 12,524 ऊपये करण्यात आले आहे. या मार्गावर परतीचे तिकीट 14308 ऊपये असेल. जे नियमित भाड्याच्या जवळपास तिप्पट आहे. कोलकाता-गोवा, चेन्नई-गोवा, अहमदाबाद-गोवा आदी मार्गांवरही विमान तिकीट दरात दुप्पट ते तिप्पटीने वाढ करण्यात आली आहे. अशाच प्रकारे वातानुकूलित आणि बिगर वातानुकूलित स्लीपर बसच्या दरातही वाढ झाली असून काही मार्गावर तर हे प्रमाण नेहमीच्या विमान भाड्यापेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.