महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हुबळी येथील उद्योजिका 'रुपतारा सांगलीकर' यांची दक्षिण भारतीय महिला अचिव्हर म्हणून निवड

04:06 PM Jan 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रुपतारा यांना SIWAA या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Advertisement

हुबळी : साईवा या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेने हुबळी येथील तरुण उद्योजिका रुपतारा शिवाजी सांगलीकर यांची दक्षिण भारतीय महिला अचिव्हर म्हणून नुकतीच निवड केली आहे. त्यानिमित्त त्यांना साईवा २०२४ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. रुपतारा या महिलांसाठी एक प्रेरणा असून त्यांना आपल्या मेहनतीचं फळ मिळालं आहे. त्यांनी आपली स्वतःची नवीन परिवहन सेवा सुरू करून आपल्या ग्राहकांना उत्कृष्ट सेवा पुरविणाऱ्या रूपतारा या सौंदर्य आणि मॉडेलिंग क्षेत्रात निर्माण केली आहे. यासह रूपतारा यांना राष्ट्रीय स्तरावरील सौंदर्य स्पर्धेसाठी नामांकित करण्यात आले होते. त्यांनी क्लासिक मिसेस इंडिया कर्नाटकाचे उपविजेतेपद मिळविलेले आहे. रूपतारा या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून , आज पर्यंत त्यांनी हुबळी, बेळगाव व कलबुर्गी येथे काम केले आहे. स्वत:चा व्यवसाय सुरू करून महिला स्वावलंबी होऊ शकतात, हे त्यांनी आपल्या जीद्धीच्या जोरावर अथक परिश्रम करत दाखवून दिले आहे. यामुळे ते इतरांसाठी आदर्शवत आहे. ट्वेल मासिकाने आयोजित केलेल्या या साऊथ इंडिया वुमन अचिव्हर्स अवॉर्ड – साईवा २०२४ हा कार्यक्रम महिला सक्षमीकरण करण्याच्या हेतूने आयोजित करण्यात आला होता.

Advertisement

यंदा या पुरस्कार वितरण सोहळ्याचे ६ वे पर्व होते. ज्याची सुरुवात 2019 साली झाली आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजविणाऱ्या देशाच्या विविध भागातील तब्बल २०७ महिलांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यामुळे या कार्यक्रमाने हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नांव नोंदवून नवा विक्रम केला आहे. दरम्यान आपल्याला मिळालेला हा पुरस्कार, माझ्या जीवनातील प्रत्येक हितचिंतक व मित्रपरिवारानी माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे प्राप्त झाला आहे, त्यांच्या मदतीमुळेच आपण हे यश प्राप्त करू शकलो. आपण त्या सर्वांचे शतशः आभारी आहोत, असे पुरस्कार विजेत्या रुपतारा यांनी सांगितले. तसेच साईवाचे सीईओ दीपक ताटेर जैन यांनी, मला साउथ इंडिया वुमेन्स अचिव्हर्स अवॉर्ड या राष्ट्रीय पुरस्कारासाठी उत्तम असे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल आपण त्यांचे मनापासून आभारी आहे असे त्यांनी यावेळी सांगितले. या पुरस्कार सोहळ्यामुळे हिंदुस्थान बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नांव नोंदविले गेल्याने रुपतारा यांनी ट्वेल मासिकाला शुभेच्छा दिल्या आहेत. जीवन हा एक सुंदर प्रवास आहे त्यामुळे प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या असे सांगून रुपतारा यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ट्वेल मासिकाचे संस्थापक दीपक ताटेर जैन, संचालिका सिंधू मंगळवेढा आदी मान्यवर उपस्थित होते

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article