अॅल्युमिनियम फॉइलची टोपी घालण्याचा प्रकार
सध्या सोशल मीडियावर काही व्हिडिओ आणि छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यात रशियन महिला अॅल्युमिनियम फॉइलने निर्मित अजब टोपी परिधान करून दिसून येत आहेत. काही व्हिडिओंमध्ये रशियन महिला टोपी तयार करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावर अॅल्युमिनियम फॉइलची टोपी परिधान केलेल्या महिलांच्या वेगवेगळ्या समुहांची छायाचित्रे व्हायरल होत आहेत. यामागील कारण देखील तितकेच रंजक आहे. या महिलांसोबत एका ब्लॉगरने प्रँक करत असे करविले आहे.
एका बेलारुसी ब्लॉगरने रशियन शिक्षिकांना नाटो उपग्रहांच्या रेडिएशनपासून वाचण्यासाठी अॅल्युमिनियम फॉइलची टोपी तयार करणे आणि ती घालण्यासाठी तयार केले. ब्लॉगर व्लदिस्लाव बोखान हे अशाप्रकारच्या थट्टेसाठी ओळखले जातात. त्याने अनेक रशियन ध्वजाने सजलेल्या अॅल्युमिनियम फॉइल टोपी परिधान केलेल्या रशियन महिलांची छायाचित्रे जारी केली आहेत.
त्याने कथित स्वरुपात रशियातील वोरोनिश क्षेत्रातील अनेक शाळांशी संपर्क साधला. स्वत:ला युनायटेड रशियाच्या (देशातील सत्तारुढ पक्ष) स्थानिक शाखेचा पदाधिकारी असल्याचे भासविले आणि ‘हेल्मेट ऑफ द फादरलँड’ नावाचा ए देशभक्ती मास्टर क्लास आयोजित करण्याचा आदेश शिक्षिकांना दिला. या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षिकांनी ‘नाटो उपग्रहाच्या’ किरणोत्सर्गापासून स्वत:ला वाचविण्यासाठी स्वत:च्या तत्परते प्रदर्शन घडवावे असे बोखानने म्हटले होते.
देशभक्तीचे प्रदर्शन
ज्या शाळांशी संपर्क साधला होता, त्यातील 7 शाळांनी कुठलाही प्रश्न न विचारता आपल्या निर्देशांचे पालन केल्याचे कळल्यावर बोखानला आश्चर्य वाटले. नाटो सदस्य रशियन लोकांना शारीरिक अणि जैविक स्वरुपात रेडिएट करण्याची योजना आखत असल्याने शिक्षिकांना अॅल्युमिनियम फॉइल टोपी यासारख्या सुरक्षा साधनांच्या मदतीने बचाव करावा लागेल असे ब्लॉगरने सांगितले होते.
ब्लॉगरने चॅटजीपीटीचा वापर करत टोपी तयार करण्यासाठीच्या मार्गदर्शन पत्रिकेची प्रत शिक्षिकांना दिली होती. 7 वोरोनिश शाळांमध्sय शिक्षिकांनी अॅल्युमिनियम फॉइल टोपीकरता मास्टर क्लास आयोजित केला होता. यातील काही शिक्षिकांनी स्वत:च्या हाताने निर्मित हेडगियरला सजविले आणि स्वत:च्या डोक्यावर ठेवून पोझ दिली. एका शिक्षिकेने मास्टरक्लासमधील सहभागाचे प्रमाणपत्रच मागितले होते. तर अन्य शिक्षिकेने ही टोपी परिधान करण्याचे अतिरिक्त लाभ सांगितले आहेत.