For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान कसे करावे ? जाणून घ्या काय आहे महत्व

12:36 PM Nov 11, 2023 IST | Kalyani Amanagi
नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान कसे करावे   जाणून घ्या काय आहे महत्व
Advertisement

दिवाळीत नरकचचतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान करण्याची परंपरा आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उटणे आणि सुगंधी तेलाने स्नान केले जाते. नरकचतुर्दशीला यमराज आणि भगवान श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते आणि सुख, समृद्धी आणि अकाली मृत्यूपासून संरक्षणासाठी कामना केली जाते.यावर्षी १२ नोव्हेंबर ला चतुर्दशी आहे. आज आपण नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान का आणि कसे केले जाते आणि त्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात.

Advertisement

शास्त्रानुसार नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंगस्नान म्हणतात. पण हे स्नान योग्यरित्या करायला हवे.यासाठी आंघोळीपूर्वी तिळाच्या तेलाने किंवा मोहरीच्या तेलाने शरीराची मालिश करावी. या तेलानेही डोक्याला मसाज करा. त्यानंतर १५ ते २० मिनिटे शांत चित्ताने बसून ध्यान करा. त्यानंतर तयार उटणे किंवा हळद, चंदन पावडर, तीळ पावडर, तांदूळ पावडर, दही मिसळून पेस्ट तयार करा आणि संपूर्ण शरीरावर घासून घ्या. १५ ते २० मिनिटे कोरडे होऊ द्या आणि नंतर कोमट पाण्याने आंघोळ करा.

अभ्यंग स्नानाचे महत्व

Advertisement

उटण्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. जे त्वचेसाठी खूप उपयुक्त असतात. उटणे लावण्याने संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. या प्रक्रियेद्वारे शरीरातील छिद्रे उघडतात. शरीराला ताजेपणा येतो. अभ्यंगाच्या माध्यमातून माणसाला सौंदर्याचे वरदान मिळते. यामुळे शरीराला अनेक फायदे मिळतात, जसे की चांगला रक्तप्रवाह, त्वचेचा मुलायमपणा, तणावापासून आराम आणि मन शांत होते.

Advertisement
Tags :

.