For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अशी कशी ही निवडणूक...

06:03 AM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
अशी कशी ही निवडणूक
Advertisement

कोणतीही निवडणूक म्हटली की. मोठमोठी होर्डिंग्ज, मिरवणुका, रोड शो, नेत्यांची भाषणे, उमेदवारांच्या सभा इत्यादी प्रसंगांचे दृष्य आपल्या डोळ्यांसमोर उभे राहणे स्वाभाविक आहे. पण हे सर्व न करताही एखादी मोठी निवडणूक होऊ शकते, हे आपल्याला कोणाकडून समजले, तर आपला विश्वास बसणे कठीण आहे.

Advertisement

तथापि, जपान एक असा देश आहे, की जेथे हा सर्व फापटपसारा पूर्णत: टाळला जातो. तरीही या देशात निवडणुका व्यवस्थित पार पडतात. जपान देशात वास्तव्य करणाऱ्या ऊर्वशी नामक युवतीने पोस्ट केलेला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओत जपानमध्ये निवडणुकांचा प्रचार कसा चालतो, याचे चित्रण आहे. या देशात निवडणुका, मग त्या मोठ्या असोत किंवा छोट्या, अत्यंत साध्या पद्धतीने आणि सोज्वळपणाने पार पडल्या जातात. उमेदवारांचा भर लोकांचे आपल्या कामांसंबंधी प्रबोधन करण्यावर असतो. आपल्याकडच्यासारखा प्रचाराचा धडाका लावला जात नाही. ध्वनिप्रदूषण केले जात नाही. उमेदवारांकडून केवळ अत्यल्प उपस्थिती असणाऱ्या कोपरा सभा घेतल्या जातात. कानठळ्या बसतील असा आरडाओरडा केला जात नाही. मतदारांना आमिषे दाखवून त्यांची मते ‘विकत’ घेण्याचा प्रकार तर कोणाच्या मनातही येत नाही, असे दिसून येते.

कोपरा सभा घेण्याची पद्धतीही आपल्याला आश्चर्य वाटेल अशी आहे. मार्गांवरच्या वाहतुकीला कोणताही अडथळा होणार नाही, अशा प्रकारे त्या घेतल्या जातात. रिकाम्या जागी एक स्क्रीन बसविला जातो. त्यावर त्या मतदारसंघातील उमेदवारांची छायाचित्रे असतात. यापलिकडे काहीही सनते. प्रचार होत असताना लोक त्यांची कामे थांबवत नाहीत किंवा गर्दीही करत नाहीत. कित्येकदा तर अशा कोपरा सभांना अत्यल्प लोक उपस्थित असतात. हे व्हिडीओ चित्रण पाहून भारतातील अनेकांनी हे अविश्वसनीय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर भारतात अशा प्रकारे निवडणुका केव्हा होती, याची आम्ही प्रतीक्षा करीत आहोत, अशा प्रकारचे मते अनेक दर्शकांनी सोशल मिडियावर व्यक्त पेले आहे .

Advertisement

Advertisement
Tags :

.