महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

दशकात परिवारांचा मासिक खर्च दुप्पटीपेक्षा अधिक

06:31 AM Feb 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एनएसएसओच्या सर्वेक्षणातून खुलासा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्याल्याच्या (एनएसएसओ) नव्या अध्ययनातून देशात परिवारांचे प्रतिव्यक्ती मासिक घरगुती खर्च 2011-12 च्या तुलनेत 2022-23 मध्ये दुप्पटीपेक्षा अधिक झाल्याचे समोर आले आहे.

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या अंतर्गत एनएसएसओने ऑगस्ट 2022 पासून जुलै 2023 दरम्यान परिवारांचा उपभोग खर्च सर्वेक्षण (एचसीईएस) करविले होते. या सर्वेक्षणाचे निष्कर्ष केंद्र सरकारने आता जारी केले आहेत. देशातील ग्रामीण आणि शहरी क्षेत्रे, राज्ये अणि केंद्रशासित प्रदेश आणि विविध सामाजिक-आर्थिक समुहांसाठी घरगुती मासिक प्रतिक्यक्ती उपयोग खर्च (एमपीसीई) आणि याच्या वितरणाचे वेगवेगळे अनुमान तयार करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.

मागील दोन दशकांमध्ये ग्रामीण आणि शहरी परिवारांमध्ये सरासरी मासिक खर्च जवळपास  समान झाल्याचे आकडेवारीतून समजते. नव्या सर्वेक्षणानुसार वर्तमान किमतींवर भारतीय घरांमध्ये सरासरी मासिक प्रतिव्यक्ती खर्च (एमपीसीई) 2011-12 नंतरपासून शहरी परिवारांमध्ये 2,630 पासून वाढत 6,459 रुपये झाला आहे. तर ग्रामीण घरांमध्ये 1,430 पासून वाढत 3,773 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

अध्ययनानुसार 2011-12 च्या किमतींवर शहरी क्षेत्रांमध्ये सरासरी एमपीसीई (पर्यायी आकडेवारीशिवाय) 2011-12 च्या 2630 रुपयांवरून वाढत 2022-23 मध्ये 3,510 रुपये झाला आहे. अशाचप्रकारे ग्रामीण क्षेत्रांमध्ये हा आकडा 1,430 रुपयांवरून वाढत 2,008 रुपये झाला आहे.

शहरी क्षेत्रांमध्ये वर्तमान किमतींवर सरासरी एमपीसीई (पर्यायी आकडेवारीसोबत) देखील 2011-12 च्या 2,630 रुपयांवरून वाढत 2022-23 मध्ये 6,521 रुपये झाला आहे. अशाचप्रकारे ग्रामीण क्षेत्रांमध्ये हे प्रमाण 1,430 रुपयांवरून वाढत 3,860 रुपये झाले आहे.

एमपीसीईचा अनुमान सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 2,61,746 घरांमधून (ग्रामीण क्षेत्रांमध्ये 1,55,014 आणि शहरी क्षेत्रांमध्ये 1,06,732) एकत्र करण्यात आलेल्या आकडेवारीवर आधारित आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article